शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय नेत्यांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात औषधं कशी पोहोचली?; हायकोर्टानं गौतम गंभीरला झापलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 13:06 IST

दिल्लीतील नागरिकांसाठी भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यानं रेमडेसिवीर आणि फॅबीफ्लू औषधांचं मोफत वाटप केलं.

दिल्लीतील नागरिकांसाठी भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यानं रेमडेसिवीर आणि फॅबीफ्लू औषधांचं मोफत वाटप केलं. कोरोना काळात रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणावत वाढली होती. त्यामुळे रुग्णांना ते सहज उपलब्ध होत नव्हतं. याच मुद्द्यावरुन दिल्ली हायकोर्टानं गौतम गंभीर याला खडेबोल सुनावले आहेत. 

"गौतम गंभीर एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू राहिला आहे. ते आता एक राजकीय नेते देखील आहे. त्यांनी गरजूंना रेमडेसिवीर आणि फॅबीफ्लूची औषधं वाटली. पण त्यांनी केलेल्या मदतीचं स्वरुप हे योग्य होतं का? त्यांच्या वागण्याला जबाबदार नागरिकाचं वागणं म्हणता येईल का?    देशात जेव्हा या औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालेला असताना त्याचा साठा आपल्याकडे करणं योग्य ठरेल का याचा विचार त्यांनी का नाही केला?, अशा प्रश्नांची सरबत्तीच हायकोर्टानं उपस्थित केली आहे. 

कुणाच्या प्रिस्क्रिप्शननं इतक्या मोठ्या प्रमाणात औषधं गौतम गंभीर यांना उपलब्ध करुन दिली गेली, असाही सवाल हायकोर्टानं विचारला आहे. ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियानं या प्रकरणात लक्ष घालावं आणि औषधांचा असा मोठ्या प्रमाणात साठा करणं गुन्हा नाही का याची पडताळणीकरुन योग्यती कारवाई करावी, अशा सूचना हायकोर्टानं दिल्या आहेत. यात एकट्या गौतम गंभीर यांच्यावर नव्हे, तर ज्या डॉक्टरनं इतक्या मोठ्या प्रमाणात औषधं मागवण्यासाठी प्रिस्क्रिप्शन दिलं, ज्या केमिस्टनं पुरवठा केला यासर्वांची माहिती घेऊन त्यांना यात जबाबदार धरावं, असंही हायकोर्टानं नमूद केलं आहे. हायकोर्टानं घेतलेल्या भूमिकेमुळे आता भाजप खासदार गौतम गंभीर याला रेमडेसिवीर आणि फॅबीफ्लू औषधांचं वाटप प्रकरणं भोवणार असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.  

टॅग्स :Gautam Gambhirगौतम गंभीरBJPभाजपाHigh Courtउच्च न्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्या