शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

कोविशिल्ड लस तयार कशी होते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 05:06 IST

Corona Vaccine: कुप्यांमध्ये साठवलेली लस प्रदूषित होऊ नये यासाठी खूप काळजी घेतली जाते. कुप्यांमध्ये लस साठवल्यानंतर ती छाननी प्रक्रियेसाठी पुढे पाठवली जाते छाननी प्रक्रियेत दर्जानुसार कुप्यांवर मंजूर आणि नामंजूर असे शिक्के मारले जातात. नामंजूर झालेल्या कुप्या बाद ठरवल्या जातात

कोविशिल्ड लसनिर्मितीची प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित आहे. ज्या कुप्यांमध्ये लस साठवायची आहे त्या आधी स्वच्छ करण्यात येऊन एका उच्च क्षमतेच्या टनेलमध्ये त्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात येतेकुप्यांमध्ये साठवलेली लस प्रदूषित होऊ नये यासाठी खूप काळजी घेतली जाते. कुप्यांमध्ये लस साठवल्यानंतर ती छाननी प्रक्रियेसाठी पुढे पाठवली जातेछाननी प्रक्रियेत दर्जानुसार कुप्यांवर मंजूर आणि नामंजूर असे शिक्के मारले जातात. नामंजूर झालेल्या कुप्या बाद ठरवल्या जातात

कोविशिल्डचे किती डोस तयार आहेत?सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लस बनविण्याचा वेग प्रतिमिनिट ५ हजार कुप्या एवढा आहे. प्रत्येक कुपीमध्ये १० डोस आहेत. डोस देण्यासाठी एकदा कुपी उघडली की तिचा पुढील ४-५ तासात वापर होणे गरजेचे आहेडोस दोन टप्प्यात द्यायचे आहेत. दोन्ही डोसमधील अंतर दोन ते तीन महिन्यांचे असेल. 

साठवणूक कशी केली जात आहे?कोविशिल्ड लस २ ते ८ डिग्री सेल्सिअस तापमानात साठवून ठेवणे आवश्यक आहेसीरममध्ये साठवणक्षमता प्रचंड प्रमाणात असून सद्यस्थितीत २ हजार कोटी मूल्याच्या लसकुप्यांची साठवण आहे. या लसकुप्यांचे रक्षण करण्यासाठी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

लस सुरक्षित आहे का?n प्रत्येक लसीचे काही ना काही दुष्परिणाम असतातचn त्यानुसार कोविशिल्डचेही काही दुष्परिणाम नक्कीच असतील. मात्र, ते गंभीर स्वरूपाचे नसतील, हे नक्कीn कोविशिल्ड लस घेतलेल्यांना दुष्परिणाम जाणवले तरी ते अल्पकाळ टिकणारे असतीलn या दुष्परिणामांमध्ये थोडा ताप येणे, घशाला सूज येणे, डोकेदुखी होणे या त्रासांचा समावेश असेलn हे सर्व दुष्परिणाम किमान दोन दिवस असतीलn एकंदर कोविशिल्ड लस सुरक्षित आहेn लसीच्या प्रयोगासाठी हजारो स्वयंसेवकांनी भाग घेतला होता. त्यांच्यावरील प्रयोगानंतर लस सुरक्षित असल्याचे स्पष्ट झालेn लस घेतल्यानंतर कोरोना होणार नाही असे नाही. परंतु त्याची तीव्रता कमी होईल

नव्या स्ट्रेनवरही कोविशिल्ड मात करेल का?n नक्कीच. कोविशिल्ड नव्या स्ट्रेनवरही परिणामकारक ठरणार आहे

लसीचे वितरण कसे केले जाणार आहे?n लसीला आपात्कालीन परिस्थितीत वापरण्याची मंजुरी मिळाली असल्याने उच्च जोखीम असलेले रुग्ण व आरोग्य कर्मचारी यांनाच लसीचे वितरण केले जाईलn पहिल्या टप्प्यानंतर लसीला सामान्य वितरणासाठी परवाना प्राप्त होईलn हा परवाना प्राप्त झाल्यानंतर खासगी क्षेत्रातही लसीचे वितरण करता येईलn मार्च वा एप्रिलमध्ये लस खासगी क्षेत्रात वितरित केली जाण्याची शक्यता आहेn केमिस्ट वा खासगी रुग्णालयांमध्येही लस सहज मिळू शकेल

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या