शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आसाममध्ये बसून आमदार नेता कसा काय निवडू शकतात? सिब्बल यांचे कोर्टात एकामागून एक १० रोखठोक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 12:47 IST

राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी सुप्रीम कोर्टात आजपासून पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

नवी दिल्ली-

राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी सुप्रीम कोर्टात आजपासून पुन्हा एकदा सुरू झाली आहे. आजपासून सलग तीन दिवस सुनावणी चालणार आहे. आजच्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल आपली बाजू मांडत असून त्यांनी आपल्या युक्तिवादात प्रश्नांची सरबत्तीच केली आहे. बहुमत असल्याचा दावा करणारे आमदार आसाममध्ये बसून आपला नेता कसा काय निवडू शकतात? असा सवाल उपस्थित करत कपिल सिब्बल यांनी वर्मावर बोट ठेवलं आहे. तसंच बहुसंख्य सोडा आपण अल्पसंख्य आमदार होते असं आपण म्हणू पण ते राज्याबाहेर जाऊन आम्हीच खरा मूळ पक्ष असा दावा करू शकतात का? असा रोखठोक सवाल कपिल सिब्बल यांनी खंडपीठासमोर उपस्थित केला आहे.

कपिल सिब्बल यांनी आजच्या युक्तिवादात राज्यपालांच्या भूमिकेबाबतची प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तसंच राज्यपालांनी घटनेच्याबाहेर जाऊन काम केल्याचाही दावा केला आहे. "एखाद्या पक्षाकडे बहुमत आहे की नाही याची कल्पना देखील नसताना अगदी पहाटे राज्यपाल शपथविधी कसा काय घेऊ शकतात? हे अलीकडच्या काळात दिसून आलं आहे की देशाच्या राजकारणात राज्यपालांचा सक्रिय सहभाग आहे, हे दुर्दैव आहे", असं कपिल सिब्बल म्हणाले. 

कपिल सिब्बल यांनी युक्तिवादात उपस्थित केलेले १० सवाल१.  बहुमत असल्याचा दावा करणारा राजकीय पक्ष व्हीप बदलू शकतो का?२. पहाटे राज्यापालंकडे दावा केला जातो आणि शपथ दिली जाते. राज्यपालांनी त्यांच्या घटनात्मक जबाबदाऱ्यांच्या पलिकडे जाऊन काम केलेलं नाही का?३. विधीमंडळ पक्षात फूट नसून राजकीय पक्षातील फूट आहे दावा केवळ बचावात्मक असून एक तृतियांश बहुमत असलेले लोकप्रतिनिधी संपूर्ण पक्षावर दावा करू शकतात का?४. निवडणूक आयोगानं आपल्या आदेशात म्हटलं की, आमच्याकडे तुमच्या पक्षाची घटना नाही. त्यामुळे आम्ही फक्त विधानसभेतील बहुमताने निर्णय देतोय आणि एकनाथ शिंदे यांना चिन्ह देत आहोत, असं करता येतं का?५. विधीमंडळाचा नेता कोण हे आमदार आसाममध्ये बसून कसा काय निर्णय घेऊ शकतात?६. न्यायालयीन आदेश पारित होण्यापूर्वी जे काही घडत होते ते महाराष्ट्राबाहेर, ईशान्येकडील राज्यात घडत होते. कुणाकडून घडत होते? तर विधानसभेच्या सदस्यांकडून. यात राजकीय पक्षाची कोणतीही बैठक झालेली नाही.७. राज्याबाहेर जाऊन पक्षातील बहुसंख्य आमदार तिथं बसून पक्षावर दावा करू शकतात का?८. फुटलेले आमदार जर शिवसेनेचे सदस्य आहेत. तर पक्षाचा व्हीप झुगारून ते शिवसेनेविरोधात भाजपाच्या उमेदवाराला मतदान कसं काय करू शकतात?९. विधी मंडळ पक्षातील फुटलेले सदस्य थेट पक्षात फूट पडल्याचं सांगून घटनेच्या १० सूचीतील नियम मोडीत काढू शकतात का?१०. पक्षांतर्गत वादाची समीक्षा कोर्टाकडून केली जाऊ शकते का?

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेkapil sibalकपिल सिब्बल