शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Provident Fund : पीएफ खात्यावरील नाव, वय 'आधार'पेक्षा वेगळं आहे?... असा करा बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 14:29 IST

Provident Fund : पीएफ खात्यातील खासगी माहितीत असा करा बदल

नवी दिल्ली -  खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पगारातून एक ठराविक रक्कम कापून कर्मचारीभविष्य निर्वाह निधी (EPFO)मध्ये जमा केली जाते. मात्र काही जणांच्या पीएफ स्टेटमेंटमध्ये नाव, जन्म दिवस किंवा तारीख आधार कार्डमध्ये नमूद करण्यात आलेल्या माहितीसोबत मिळती-जुळती नसल्यानं फंड काढताना अनेक समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहेत.  नुकतेच सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, 8.38 कोटींहून अधिक पीएफ अकाऊंटमध्ये सदस्यांचा जन्म दिवसाची चुकीची नोंदणी आहे, तर 11.07 कोटी खातेधारकांच्या सदस्यांच्या वडिलांच्या नावाचा उल्लेखच नाहीय. या सर्व गोष्टींमुळे भविष्यात कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी पीएफ खात्यामध्ये आपले नाव आणि जन्म तारीखदेखील आधार कार्डमध्ये नमूद करण्यात आलेल्या माहितीशी मिळती-जुळती आहे की नाही?, याची पडताळणी खातेधारकांनी करणे आवश्यक आहे. 

जर आधार कार्ड आणि पीएफ खात्यातील खासगी माहिती सारखी नसेल तर ती त्वरित आवश्यक ते बदल करावेत. हा बदल करणं जर तुम्हाला डोकेदुखी वाटत असेल तर तसं अजिबात नाहीय. पीएफ खात्यातील खासगी माहिती बदलणं अगदी सोपे आहे. आपली खासगी माहिती तुम्ही ऑनलाइनदेखील अपडेट करू शकता.  

अशी करा माहिती अपडेटपीएफ खात्यात ऑनलाइन सुधारणा करावयाची असल्यास, या 4 गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत. 1. अॅक्टिव्ह युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (UAN) 2. EPFO वेबसाइट माहिती 3. आधार नंबर 4. आपला अर्ज EPFO पाठवणे

EPFO खात्यातील माहिती बदलताना सर्वप्रथम आधार कार्डवरील सर्व माहिती योग्य आहे की नाही, याची खात्री करुन घ्यावी. आधार कार्डवरील माहिती चुकीची असल्यास पीएफ खात्यात कोणताही बदल होऊ शकणार नाही. यासाठी तुम्हाला आधी आधार कार्डमध्ये सुधारणा करावी लागेल. त्यानंतरच EPFO खात्यातील माहिती अपडेट होणं शक्य होईल.  PF खात्यातील खासगी माहिती कशी अपडेट करावी? हा बदल दोन प्रकारे केला जाऊ शकतो. एक कर्मचाऱ्याकडून आणि दुसरा कंपनीकडून आवश्यक ते बदल केले जाऊ शकतात.  - EPFOच्या वेबसाइटला भेट देऊन तेथील माहिती आधार कार्डमध्ये नमूद करण्यात आलेल्या माहितीनुसार बदलावी. - केलेल्या बदलाची माहिती आपल्या कंपनीलाही द्यावी. - आपल्याकडून केलेला बदल सिस्टमवर अपडेट होईल आणि त्यानुसार 'आधार'सोबत माहितीची जोडणी केली जाईल. - पडताळणीनंतर हा माहिती अर्ज कंपनीकडे हस्तांतरित केला जाईल. - यानंतर हा अर्ज कंपनीकडून  EPFOकडे पाठवला जाईल. - EPFOकडून आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील. 

खासगी माहितीत ऑफलाइन सुधारणा कशी करावी ? - इंटरनेटशिवाय खासगी माहितीमध्ये सुधारणा करावयाची असल्यास  संबंधित अर्ज कर्मचारी आणि कंपनीद्वारे भरल्यानंतर  EPFO कार्यालयात पाठवला जाऊ शकतो. 

टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीEmployeeकर्मचारीAdhar Cardआधार कार्ड