शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एक कोटी घरे २०२२ मध्ये नव्हे, पुढील वर्षीच देणार, गृहनिर्माणमंत्री पुरी यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 04:57 IST

शहरी भागांत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत एक कोटी घरे दोन वर्षे आधीच उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

नवी दिल्ली : शहरी भागांत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत एक कोटी घरे दोन वर्षे आधीच उपलब्ध करून दिली जाणार आहेत. २०२२ मध्ये ही एक कोटी घरे बांधून पूर्ण केली जाणार होती, ती आता २०२० मध्ये उपलब्ध होतील, अशी घोषणा मंगळवारी केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाने केली.केंद्रीय गृहनिर्माणमंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की, आवश्यक त्या संख्येतील घरांना पुढील वर्षीच्या पहिल्या तिमाहीत मंजुरी मिळेल आणि बांधकाम वर्षअखेर पूर्ण होईल असा मला आत्मविश्वास आहे. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले होते की, ‘सर्वांसाठी घर हे स्वप्न साकारण्यासाठी सर्व ते उपाय केले जातील. घरांमुळे कोट्यवधी आकांक्षांना पंख लाभतील.’हरदीपसिंग पुरी यांनी सांगितले की, एक कोटी घरांची मागणी असून, त्यापैकी ४.८३ लाख कोटी रुपये गुंतवणुकीच्या ८१ लाखांपेक्षा जास्त घरांना मंजुरी मिळाली आहे. पीएमएवाय योजनेत के्रडिट लिंकड् सबसिडीअंतर्गत ६.३२ लाख कुटुंबांनी व्याज अनुदानाचा लाभ घेतलाआहे.संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात प्रकल्पांना केंद्रातून परवानगी दिली जायची. आम्ही मात्र राज्यांना एका टेबलवर आणून प्रगती साधली आहे. सहकाराचे संघराज्यीय उदाहरण आम्ही प्रत्यक्ष घडवले आहे, असे पुरी म्हणाले.पायाभूत सुविधा आणखी सुधारणारमोदी म्हणाले की, ‘‘माझे सरकार शहरी भागातील पायाभूत सुविधांना आणखी सुधारण्यास बांधील आहे.’’ त्यांनी गेल्या चार वर्षांत शहरांचा चेहरामोहरा बदलून टाकण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजना, अमृत आणि स्मार्ट सिटीज मोहिमांचा उल्लेख केला.

टॅग्स :HomeघरIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार