केजरीवालांचे घर आहे की शीतगृह?

By Admin | Updated: July 4, 2015 02:27 IST2015-07-04T02:27:38+5:302015-07-04T02:27:38+5:30

एकेकाळी सरकारी निवासस्थान नाकारत वेगळेपण सिद्ध करू पाहणारे आम आदमी पार्टीचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी

The house of Kejriwal's house? | केजरीवालांचे घर आहे की शीतगृह?

केजरीवालांचे घर आहे की शीतगृह?

नवी दिल्ली : एकेकाळी सरकारी निवासस्थान नाकारत वेगळेपण सिद्ध करू पाहणारे आम आदमी पार्टीचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी ३० एसी आणि असंख्य कूलर्स लावत आपली बात ‘आम’ राहिली नसल्याचे दाखवून दिले आहे. जून महिन्यातील त्यांच्याकडील विजेचे बिल १.३५ लाख रुपये आले असून काँग्रेस आणि भाजपने हा मुद्दा बनवीत जोरदार हल्लाबोल चालविला आहे.
सिव्हिल लाईन्स येथील केजरीवालांच्या ६ फ्लॅग स्टाफ रोड निवासस्थानी विजेचे दोन मीटर असून त्यापैकी एका मीटरचे बिल २२,६८९ रुपये, तर दुसऱ्याचे १,१३,५९८ रुपये एवढे आले आहे. गेल्या महिन्यात आरटीआय अर्जावर माहिती देताना दिल्ली सरकारने एप्रिल आणि मे महिन्याचे बिल ९१ हजार रुपये असल्याचे नमूद केले होते. केजरीवालांच्या निवासस्थानी खूप कमी वीज वापरली जात असून या दोन महिन्यांच्या बिलाला आॅफिसमधील विजेचे शुल्क जोडण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले. केजरीवालांच्या घरी ३० पेक्षा जास्त एसी असून असंख्य कूलर लावले आहेत. कार्यालयीन कामासाठी घरगुती कनेक्शन वापरल्याबद्दल वीज वितरण कंपनी त्यांना नोटीस पाठवू शकते, असे सूत्रांनी म्हटले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

काँग्रेस, भाजपचा हल्लाबोल
केजरीवाल वैयक्तिक वापरासाठी सरकारी निधी वाया घालवत आहेत. सत्तेवर आल्यानंतर आपच्या नेत्यांनी आलिशान राहणीत न अडकता ‘आम’ लोकांप्रमाणे राहावे, असा सल्ला दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांनी दिला आहे.
केजरीवाल वैयक्तिक सुविधेसाठी सार्वजनिक निधीचा गैरवापर करीत असल्याचा आरोप भाजपचे विजेंदर गुप्ता यांनी केला आहे. दिल्लीतील जनतेला ‘आप’चा खरा चेहरा कळून चुकला आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: The house of Kejriwal's house?