शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

आता तुमच्या हॉटेल बिलावरही सरकारची नजर; जाणून घ्या इन्कम टॅक्सचे नवे नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 1:05 AM

दागिने खरेदी, हॉटेल बिलाचेही होणार स्कॅनिंग

नवी दिल्ली : एक लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचे शैक्षणिक शुल्क आणि देणगी (डोनेशन) तसेच एवढ्याच रकमेचे दागिने, चैनीच्या वस्तू आणि पेंटिंग यांची खरेदी आता प्राप्तिकराच्या छाननीच्या (स्कॅनिंग) कक्षेत येणार आहे. याशिवाय बिझनेस क्लासचा देशांतर्गत तसेच विदेशी प्रवास तसेच २० हजार रुपयांवरील हॉटेलच्या बिलावरही प्राप्तिकर विभागाची नजर राहणार आहे. मोदी सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या एका ट्विटमधून ही माहिती समोर आली आहे.कराची व्याप्ती वाढविण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा भाग म्हणून या पर्यायांवर सरकार विचार करीत आहे, असे सरकारने जारी केलेल्या टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे.प्राप्त माहितीनुसार, अधिकाधिक आर्थिक व्यवहार प्राप्तिकर विभागाला कळविण्याच्या कक्षेत आणले जात आहेत. याचाच अर्थ ठरावीक रकमेच्या वरील आर्थिक व्यवहारांची माहिती वित्तीय संस्था आणि इतर संस्थांकडून प्राप्तिकर विभागास कळविली जाईल. या माहितीच्या आधारे प्राप्तिकर विभाग अशा लोकांचा शोध घेईल, जे मोठी खरेदी करतात; पण कर देत नाहीत अथवा प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करीत नाहीत. कराधार व्यापक करण्याच्या उद्देशाने सरकारकडून ही पावले उचलली जात आहेत.एक लाख रुपयांच्या वरील दागिने खरेदी तसेच एक लाखांवरील शैक्षणिक शुल्क आणि देणग्यांची (डोनेशन) छाननीही प्राप्तिकर विभाग करू शकेल. बिझनेस क्लासने केलेला देशांतर्गत विमान प्रवास तसेच विदेश प्रवासही प्राप्तिकरच्या कक्षेत आणण्यात येत आहे. इतकेच काय २० हजार रुपयांपेक्षा जास्तीचे हॉटेल बिलही प्राप्तिकरच्या कक्षात आणण्यावर विचार केला जात आहे.

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्स