वसतिगृह कर्मचारी मानधना पासून वंचित

By Admin | Updated: January 31, 2015 00:34 IST2015-01-31T00:34:37+5:302015-01-31T00:34:37+5:30

सुरगाणा : समाज कल्याण विभागामार्फत चालविण्यात येत असलेल्या अनुदानित वसतिगृह कर्मचारीना गेल्या तेरा महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने या सर्वांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने लवकरात लवकर थकलेले संपूर्ण मानधन एक रकमी देऊन होत असलेली आर्थिक अडवणूक दूर करावी अशी या कर्मचारीकडून मागणी केली जात असून, त्याकडे मात्र संबंधिताकडून दुर्लक्ष होत आहे.

The hostel staff deprived from the honor | वसतिगृह कर्मचारी मानधना पासून वंचित

वसतिगृह कर्मचारी मानधना पासून वंचित

रगाणा : समाज कल्याण विभागामार्फत चालविण्यात येत असलेल्या अनुदानित वसतिगृह कर्मचारीना गेल्या तेरा महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने या सर्वांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने लवकरात लवकर थकलेले संपूर्ण मानधन एक रकमी देऊन होत असलेली आर्थिक अडवणूक दूर करावी अशी या कर्मचारीकडून मागणी केली जात असून, त्याकडे मात्र संबंधिताकडून दुर्लक्ष होत आहे.
तालुक्यात समाज कल्याण विभागामार्फत अनुदानित वसतिगृह चालविले जातात. यामध्ये अधीक्षक यांना आठ हजार, स्वयंपाकी सहा हजार, पहारेकरी पाच हजार व मदतनीस पाच हजार याप्रमाणे मानधन मिळते. सध्या मिळणारे मानधन हे तुटपुंज असून, त्यातच हे मानधन गेल्या तेरा महिन्यापांसून अनेक वेळा मागणी करूनही अद्यापपर्यंत मिळालेले नाही. पगार न मिळाल्याने त्यांना कौटुंबिक आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
राज्यात मागासवर्गीय अनुदानित वसतिगृहाची संख्या २८३३ आहे. या वसतिगृहातील ८१०४ कर्मचारीना मानधन न मिळाल्याने या सर्वांनाच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे कर्मचारी संघटनेने म्हटले आहे. महाराष्ट्र शासनाची सर्वात जुनी व शंभर टक्के अनुदानित असणार्‍या या १९५२ पासून ते आत्तापर्यंत कर्मचारी हे वेठबिगारीचे जीवन जगत असून, तेरा महिन्यांपासून त्यांचे रखडलेले मानधन त्वरित दिले जावे. अशी मागणी वसतिगृह कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष फुलसिंग गायकवाड, अधीक्षक भास्कर गावित, विठ्ठल चौधरी, मोहन पवार, निकम, खैरनार आदिंनी केली आहे.

Web Title: The hostel staff deprived from the honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.