शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

सूचनांकडे दुर्लक्ष केल्यानेच रुग्णालयांना आगी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 6:38 AM

गुजरातमध्ये चार महिन्यांत हॉस्पिटल्समध्ये आगीच्या ६ गंंभीर दुर्घटना

नितीन अग्रवाल

नवी दिल्ली : भंडाऱा जिल्हा सामान्य रुग्णालयात १० नवजात अर्भकांचा जीव घेतलेल्या आगीने रुग्णालयाच्या प्रशासकांच्या निष्काळजीपणाला उघडे पाडले आहे. रुग्णालयांत लागणाऱ्या आगी या सर्वोच्च न्यायालय आणि गृहमंत्रालयाने दिलेले आदेश आणि मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे लागत असून त्याची किमत रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना मोजावी लागत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने १८ डिसेंबर, २०२० रोजी दिलेल्या आपल्या आदेशात रुग्णालयांत लागणाऱ्या आगींसाठी स्पष्टपणे रुग्णालय प्रशासनाला जबाबदार ठरवले आहे. न्यायालयाने सगळ्या राज्यांना प्रत्येक रुग्णालयात फायर सिक्युरिटी ऑडिट करून रुग्णालयांना अग्नीशमन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्याचे आदेश दिले. असे न केल्यास रुग्णालय व्यवस्थापनावर कठोर कारवाईचे आदेश संबंधित विभागांना दिले होते. या आधी गृह मंत्रालयाने ३० नोव्हेंबर रोजी देशात सगळी रुग्णालये आणि नर्सिंग होम्समध्ये आगीपासून सुरक्षेचे उपाय पाळण्याचे दिशा निर्देश दिले होते.भंडाऱ्यातील घटनेतून हे स्पष्ट झाले की, रुग्णालय प्रशासनाने केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले असते तर १० मुलांचा जीव वाचला असता. इंटरनॅशनल जर्नल ऑफ कम्युनिटी मेडिसीन अँड पब्लिक हेल्थच्या ताज्या अहवालानुसार गेल्या १० वर्षांत देशात रुग्णालयांत आगीच्या ३३ मोठ्या घटना घडल्या. गुजरातमध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान रुग्णालयांत आगीच्या सहा घटना घडल्या व त्यात अनेकांचा मृत्यू झाला. अहमदाबादेत श्रेय रुग्णालयात ८ आणि राजकोटमध्ये उदय शिवनंद कोविड रुग्णालयात आग लागून ५ जणांचा मृत्यू झाला होता. या रुग्णालयाच्या मुख्य प्रशासकांना अटक झाली होती. ऑगस्ट महिन्यात आंध्र प्रदेशमध्ये विजयवाड़ात कोविड केअर सेंटरला लागलेल्या आगीत ११ जण मरण पावले होते. या घटनेत व्यवस्थापनातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक झाली होती.

रुग्णालयांना लागलेल्या आगीच्या प्रमुख घटनाn ९ डिसेंबर, २०११ - कोलकातात एएमआरआय रुग्णालयात ९० पेक्षा जास्त मृत्यू.n १३ जानेवारी, २०१३ - बिकानेरमध्ये पी.बी.एम. रुग्णालयात तीन रुग्ण गंभीररित्या भाजले.n १६ ऑक्टोबर, २०१५ - ओदिशातील कटकमध्ये आचार्य हरिहर रिजनल कॅन्सर सेंटरच्या शस्रक्रिया विभागात आगीत एक ठार ८० रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयांत हलवावे लागले.n १८ ऑक्टोबर, २०१६ - भुवनेश्वरमध्ये एसयूएम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात २० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू.n १६ जुलै, २०१७ – लखनौतील केजीएमयूमध्ये २५० रुग्णांच्या जीविताला होता धोका. त्यांना वेळीच दुसऱ्या रुग्णालयांत हलवले गेले.n २० डिसेंबर, २०१८ - मुंबईत ईएसआयसीत आठ जणांचा मृत्यू. १४० पेक्षा जास्त जखमी.n २३ जानेवारी, २०१९ - छत्तीसगडमध्ये छत्तीसगड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सन्मध्ये आग लागून तीन रुग्ण गंभीररित्या भाजले आणि ४० मुलांना दुसऱ्या रुग्णालयात पाठवले गेले.n ६ ऑगस्ट, २०२० - अहमदाबादेत श्रेया रुग्णालयात ८ रुग्णांचा मृत्यू.n २७ नोव्हेंबर, २०२० - राजकोटमध्ये उदय शिवानंद रुग्णालयात ५ रुग्णांचा मृत्यू. पाच महिन्यांत गुजरातमध्ये रुग्णालयात आगीच्या सात घटना घडल्या.

 

टॅग्स :fireआगhospitalहॉस्पिटलBhandara Fireभंडारा आग