शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 11:50 IST

या भीषण अपघातात चालकासह पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले.

UP Accident:उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यातून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका भरधाव रुग्णवाहिकेची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरशी जोरदार धडक झाली. या अपघातात रुग्णवाहिकेत प्रवास करणाऱ्या दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर इतर चार जण जखमी झाले. ज्या कंटेनरला रुग्णवाहिकेची टक्कर झाली त्या कंटेनरचा चालक आणि क्लीनर देखील जखमी झाले.

रुग्णवाहिकेचे तुकडे ही घटना राष्ट्रीय महामार्ग-१९ वर गोपीगंज कोतवाली परिसरात घडली. हा अपघात इतका भीषण होता की, रुग्णवाहिकेचे तुकडे झाले. वरुण नावाच्या व्यक्तीचा दिल्लीतील रुग्णालयात मृत्यू झाला. वरुणची पत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्य त्याचा मृतदेह घेऊन दिल्लीहून बिहारमधील गया येथील त्यांच्या घरी जात होते. गोपीगंजजवळील गोप्पूर येथे रुग्णवाहिकेची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरशी टक्कर झाली.

वरुणची पत्नी ममता आणि एका नातेवाईकाचा मृत्यू या अपघातात वरुणची पत्नी ममता आणि एका नातेवाईकाचा जागीच मृत्यू झाला. रुग्णवाहिकेच्या चालकासह चार जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर गोपीगंजच्या सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. रुग्णवाहिकेने ज्या कंटेनरला धडक दिली, त्या कंटेनरचा चालक आणि क्लीनरदेखील जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच गोपीगंज पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. जखमींना तात्काळ गोपीगंजच्या सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दोन्ही मृतांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत आणि शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

टॅग्स :AccidentअपघातUttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यूhusband and wifeपती- जोडीदार