उत्तर प्रदेशमधील कानपूर येथील सेन पश्चिम पारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बखरिया गावामध्ये आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली. येथे निवृत्त सैनिक चेतराम पासवान याने त्याची पत्नी सुनीता वर्मा आणि मुलगा दीप याची परवानाधारी बंदूकीने गोळी झाडून हत्या केली. त्यानंतर चेतराम दुचाकीने कथोगर-इमलीपूर रेल्वे अंडरपासजवळ गेला आणि रुळावरून येणाऱ्या मालगाडीसमोर झोपून आपलं जीवन संपवलं.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार एका व्यक्तीने जीवन संपवलं असून, रेल्वेच्या रुळांवर त्याचा मृतदेह पडला असल्याची माहिती पोलिसांना सकाळी ७.३० च्या सुमरास मिळाली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तिथे मृतदेहाच्या खिशामध्ये मिळालेलं आधार कार्ड आणि दुचाकीचया कागदपत्रावरून मृताची ओळख चेतराम अशी पटली. त्यानंतर पोलीस मृत चेतराम याच्या घरी पोहोचले तेव्हा तिथलं दृश्य पाहून त्यांना धक्का बसला. घराचा दरवाजा बाहेरून उघडा होता. तसेच खोलीमध्ये चेतराम याची पत्नी सुनीता आणि मुलगा दीप यांचे मृतदेह पडले होते. तसेच जवळच एक डबल बॅरलची बंदूक पडली होती. या बंदूकीतून गोळ्या झाडून या दोघांची हत्या करण्यात आली होती.
आता या निवृत्त सैनिकानं एवढं टोकाचं पाऊल का उचललं, याचं निश्चित कारण समोर आलेलं नाही. प्राथमिक तपासामध्ये या भयंकर घटनेमागे कौटुंबिक वाद असल्याचे समोर येत आहे. या वादातून चेतराम याने आधी पत्नी आणि मुलाला संपवल्याचे आणि नंतर स्वत:ही जीवन संपवल्याचे समोर येत आहे.
Web Summary : In Kanpur, a retired soldier, Chetram, shot dead his wife and son. He then committed suicide by lying on a railway track. Family dispute suspected cause.
Web Summary : कानपुर में एक सेवानिवृत्त सैनिक चेतराम ने अपनी पत्नी और बेटे को गोली मार दी। बाद में रेलवे ट्रैक पर लेटकर आत्महत्या कर ली। पारिवारिक विवाद का संदेह।