शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

प्रयागराजमध्ये कोरोना काळासारखंच भयावह चित्र, गंगेच्या काठावर पुन्हा दिसला मृतदेहांचा ढीग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 09:16 IST

खरे तर, आता पावसाळा तोंडावर आला आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर आणि गंगा नदीची पाणी पातळी वाढल्यानंतर, नदीच्या काठावर दफन करणअयात आलेले मृतदेह गंगेच्या पाण्यात जाण्याचा धोका आहे. यामुळे नदीही मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होईल. मात्र, याकडे जिल्हा प्रशासन आणि महापालिकेचेही पूर्णपणे दूर्लक्ष होत आहे.

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे गंगा नदीच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात मृतदेहांचे दफन केले जात आहे. येथील फाफामऊ घाटाने तर पुन्हा एकदा कोरोना काळातील आठवणी ताज्या केल्या आहेत. पूर्वीपासूनच येथे मृतदेह दफन करण्याची परंपराच आहे. पण, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) आणि जिल्हा प्रशासनाने गंगा घाटांवर मृतदेहांचे दफन करण्यावर बंदी घातली आहे. असे असतानाही येथे मृतदेहांचे दफन होणे हा एक चिंतेचा विषय आहे. फाफामऊ घाटावर रोजच्या रोज डझनावर मृतदेह वाळूत दफन केले जातात. यामुळे येथे केवल थडगेच-थडगे दिसत आहेत.

खरे तर, आता पावसाळा तोंडावर आला आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर आणि गंगा नदीची पाणी पातळी वाढल्यानंतर, नदीच्या काठावर दफन करणअयात आलेले मृतदेह गंगेच्या पाण्यात जाण्याचा धोका आहे. यामुळे नदीही मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होईल. मात्र, याकडे जिल्हा प्रशासन आणि महापालिकेचेही पूर्णपणे दूर्लक्ष होत आहे.

कोरोना काळातही दिसले होते भयावह चित्र - गेल्या वर्षी कोरोना काळात गंगा नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात मृतदेह दफन करण्यात आले होते. माध्यमांनी हा विषय उचलल्यानंतर, याची जगभरात चर्चा झाली होती. यानंतर प्रयागराज महापालिकेने वाळूत दफन केलेले शेकडो मृतदेह बाहेर काढून त्यांना अग्नी दिला. यानंतर प्रशासनाने नदीच्या काठावर मृतदेह दफन करण्यावर बंदी घातली होती. मात्र, बंदी असतानाही लोकांनी पुन्हा गंगा नदीच्या काठावर मृतदेह दफन करायला सुरुवात केली आहे.

NGT ने मागितील कोरोना काळात गंगेत आढळलेल्या मृतदेहांची माहिती - यापूर्वी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही गंगा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर मृतदेह वाहून आल्याचे दिसले होते. यावरून विरोधकांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीकाही आली आहे. यानंतर आता कोरोना काळात गंगेत किती मृतदेह आढळले अथवा नदीच्या काठावर दफन करण्यात आले, यासंदर्भात NGT ने सरकारकडून माहिती मागवली आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यूyogi adityanathयोगी आदित्यनाथ