Corona Vaccination: भयानक! गप्पांमध्ये रमलेल्या नर्सनी महिलेच्या दोन्ही दंडावर टोचली कोव्हिशिल्ड लस, पुढे जे घडले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 20:56 IST2021-07-26T20:56:12+5:302021-07-26T20:56:45+5:30
Corona Vaccination: पहिल्या नर्सने उजव्या दंडावर तर दुसऱ्या नर्सने डाव्या दंडावर 5 ते 7 सेकंदांच्या फरकाने कोव्हिशिल्डचे दोन डोस दिले.

Corona Vaccination: भयानक! गप्पांमध्ये रमलेल्या नर्सनी महिलेच्या दोन्ही दंडावर टोचली कोव्हिशिल्ड लस, पुढे जे घडले...
पंजाबच्या (Punjab) पठानकोटमध्ये कोरोना लसीकरणादरम्यान (Corona Vaccination) मोठी चूक झाली आहे. बधानी सीएचसीमध्ये बीएससी नर्सिंग स्टाफने एका महिलेच्या दोन्ही दंडांवर कोरोनाची लस टोचली. दोन लस देण्यात आल्याने तिची प्रकृती बिघडल्याने मोठा गोंधळ उडाला होता. (Nursing Staff gave covishield vaccine on both arms of women in Punjab.)
या महिलेला तीन तास डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आले. यानंतर तिला थोडे बरे वाटू लागल्याने घरी पाठविण्यात आले. मात्र, अद्याप महिलेला डोके जड झालेले वाटत असून घाबरल्याने अस्वस्थ झाली आहे. महिलेच्या कुटुंबीयांनी नर्सिंग स्टाफ गप्पाटप्पांमध्ये व्यस्त होता. याचवेळी बोलता बोलता त्यांनी दोन लशी देऊन टाकल्याचा आरोप केला आहे.
अधिकाऱ्यांनी याप्रकरणी सारवासारव करण्यास सुरुवात केली असून लसीकरण केंद्रावर गर्दी असल्याने चूक झाली आहे. दुसरीकडे नर्सकडून लिखितमध्ये स्पष्टीकरण मागितले आहे. बुगलमध्ये राहणाऱ्या 35 वर्षीय शिखा देवीला या लसी देण्यात आल्या आहेत. ती लसीकरण केंद्रावर गेली, तिथे कंत्राटी नर्स होत्या. त्यांच्यात गप्पा रंगल्या होत्या. याचेळी तिला दोन्ही दंडावर एका मागोमाग एक करून कोव्हिशिल्डचे दोन डोस देण्यात आले. यानंतर महिलेला भीतीने घाम फुटला, रक्तदाब वाढला. हे समजताच एसएमओसह नर्स स्टाफमध्ये गोंधळ उडाला. आरोग्य अधिकाऱ्यांनी महिलेला तीन तास निरीक्षणाखाली ठेवले. औषधे देऊन घरी पाठविण्यात आले.
शिखाचा पती अश्विनी यांनी सांगितले की, शिखाचा हा पहिला डोस होता. पहिल्या नर्सने उजव्या दंडावर तर दुसऱ्या नर्सने डाव्या दंडावर 5 ते 7 सेकंदांच्या फरकाने कोव्हिशिल्डचे (covishield) दोन डोस दिले. शिखाने यावेळी त्यांना विरोध केला, तोवर डोस देऊन झाले होते. याची तक्रारदेखील केली आहे.
एसएमओने सांगितले, तीन महिन्यांनी महिलेची अँटी बायोटीक टेस्ट केली जाईल. जर गरज वाटली तर तिसरा डोस दिला जाईल. तर सिव्हिल सर्जन डॉ. हरविंदर सिंग यांनी सांगितले की, माहिती घेत आहोत, दोषींवर योग्य कारवाई केली जाईल.