Horrible Accident Video: भरधाव कार अचानक अनियंत्रित होते. त्यानंतर दुभाजकावर जाऊन धडकते. वेग जास्त असल्याने कार तब्बल १५ वेळा पलटी मारते. अवघ्या काही क्षणात हे घडते. ज्यावेळी कार आलटी पालटी होते, त्यावेळी कारमधील लोक बाहेर हवेत फेकले जाऊन आदळतात आणि जागीच गतप्राण होतात.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हा अपघात घडला आहे कर्नाटकातील राष्ट्रीय महामार्ग १५ अ वर. मंगळवारी (१ एप्रिल) सकाळी ही दुर्देवी घटना घडली. कर्नाटकात चित्रदुर्ग जिल्हा आहे. जिल्ह्यातील मोनकलमुरू तालुक्यातील बोम्मक्कनहल्ली मशिदीजवळ हा अपघात घडला. यात तीन लोक जागीच ठार झाले.
वडील आणि दोन मुलं ठार
मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश आहे. अपघातग्रस्त कार चल्लकेरेवरून मोलकालमुरू मार्गे बेल्लारीकडे जात होती.
वाचा >>धक्कादायक! जालन्यात सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला
मयतांची ओळख पटली असून, ३५ वर्षीय मौला अब्दुल हे पत्नी सलीमा, आई फातिमा आणि मुलांसह बेल्लारीकडे जात होते. यात अब्दुल यांच्यासह दोन मुले रहमान (१५ वर्ष) आणि समीर (१० वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी, आई आणि एक मुलगा हुसैन गंभीर जखमी झाले. जखमींना बेल्लारी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बुलढाण्यात बस-कार अपघातात पाच जणांचा मृत्यू
बुलढाणा जिल्ह्यातही बस आणि कारचा भीषण अपघात झाला. यात पाच प्रवाशी ठार झाले. तर २४ लोक जखमी झाले. खामगाव-शेगाव मार्गावर पहाटे ५ वाजता ही घटना घडली. बोलेरो कार एसटी बसला धडकली. त्यानंतर आणखी एक खासगी बस दोन्ही वाहनांना येऊन धडकली.