शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

गुजरात निवडणुकीत काँग्रेसला आशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 06:19 IST

आप, टीएमसीला पूर्णपणे अपयशी सिद्ध व्हावे लागेल

- व्यंकटेश केसरी नवी दिल्ली : पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि आम आदमी पक्ष (आप) पूर्णपणे अपयशी सिद्ध झाले, तर गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीत काही आश्चर्यचकित करणारे घडेल, अशी राज्य काँग्रेसला आशा आहे.“गुजरातमध्ये आगामी निवडणूक बहुरंगी असेल. स्थानिक नेते आणि सत्ताधारी पक्षाबद्दलच्या नाराजीमुळे महत्त्वाच्या पक्षांतून लोक इतर पक्षांत जातील. याशिवाय आपचा आणि राज्यातील निवडणुकीत संभाव्य प्रवेश होणाऱ्या टीएमसीचा किती प्रभाव असेल हे कोणालाही माहीत नाही,” असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदाराने नाव न सांगण्याच्या अटींवर म्हटले. आप कोणत्याही स्वरुपात भाजपविरोधात काँग्रेससोबत काम करणार नाही, हे त्याचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात स्वबळावर लढण्याच्या केलेल्या घोषणेतून स्पष्ट झाले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अध्यक्ष असलेल्या टीएमसीने गोव्यात निवडणूक गांभीर्याने लढण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालच्या शेजारच्या राज्यांत (आसाम आणि त्रिपुरा) टीएमसी लक्ष घालेल, असा समज होता. त्याविरोधात हा निर्णय झाला आहे.  बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गृहराज्यात भाजपला आव्हान द्यावे, अशी गुजरात काँग्रेसमधील एका गटाची इच्छा आहे. यातून अनेक काँग्रेस नेते टीएमसीत दाखल होतील, असे संकेत आहेत.अखिल भारतीय काँग्रेस समितीचे गुजरातकडे लक्ष नसले तरी आप आणि टीएमसीच्या राज्यातील प्रवेशाने काँग्रेसच्या निवडणूक रणनीतीला धक्का बसू शकतो, असे काँग्रेसमधील अंतर्गत नेते मान्य करतात. स्वातंत्र्य दिल्यास...हृतिक पटेल आणि जिग्नेश मेवाणी यांना टीम उभी करण्याचे स्वातंत्र्य दिल्यास भाजपला काँग्रेस चांगली लढत देऊ शकेल. गुजरातमध्ये निवडणूक लढवली जाईल, असा जात हा काही एकमेव घटक नाही, तर धर्मदेखील मतदारांना एकत्र आणणारा आहे. २०१५ मधील निवडणुकीत जीएसटी, नोटाबंदी आणि सामाजिक एकीकरणाने काँग्रेसला मदत केली होती.

टॅग्स :congressकाँग्रेसGujaratगुजरात