शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

राज्याला सातव्यांदा सरन्यायाधीशपदाचा मान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 1:52 AM

न्या. शरद बोबडे यांचे वडील, भाऊ ही होते प्रख्यात वकील

नवी दिल्ली : न्या. शरद बोबडे हे महाराष्ट्राने देशाला दिलेले सातवे सरन्यायाधीश आहेत. याआधी न्या. हिरालाल कणिया (पहिले सरन्यायाधीश), न्या. पी. बी. गजेंद्रगडकर (सातवे), न्या. यशवंतराव विष्णू चंद्रचूड (१६ वे), न्या. एम. एच. कणिया (२३ वे), न्या. एस. पी. भरुचा (३० वे) आणि न्या. सरोश कापडिया (३८ वे) या मुंबई उच्च न्यायालयातून गेलेल्या न्यायाधीशांनी हे सर्वोच्च पद भूषविले होते.याखेरीज न्या. मोहम्मद हिदायतुल्ला, न्या. जयंतीलाल शहा, न्या. पी. एन. भगवती व न्या. आर. एम. लोढा या माजी सरन्यायाधीशांचाही महाराष्ट्राशी व मुंबई उच्च न्यायालयाशी अनेक वर्षे संबंध होता. डॉ. धनंजय चंद्रचूड सेवाज्येष्ठतेनुसार ९ नोव्हेंबर २०२२ रोजी सरन्यायाधीश होतील, तेव्हा हा मान महाराष्ट्राला पुन्हा मिळेल व पिता-पुत्र दोघेही सरन्यायाधीश होण्याचा अनोखा योग न्या. कणिया यांच्यानंतर पुन्हा जुळून येईल.न्या. शरद बोबडे यांचे वडील स्व. अरविंद बोबडे महाराष्ट्राचे महाधिवक्ता होते, तर बंधू स्व. विनोद बोबडे सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील होते. न्या. बोबडे सरन्यायाधीशपदी विराजमान होतानाचा क्षण बघण्यासाठी वडील व भाऊ नाहीत. पण, वयाच्या ९२ व्या वर्षी शारीरिक मर्यादांकडे दुर्लक्ष करून मातोश्री मुक्ता बोबडे यांनी सोहळ्याला उपस्थिती लावत वडिलांची व भावाची उणीव भरून काढली असेच म्हणावे लागेल.शपथविधीनंतर न्या. बोबडे यांनी सरन्यायाधीशांच्या न्यायदालनात न्यायपीठावर बसून काम सुरू केले. त्यांच्यासह नागपूरचे आणखी एक सुपुत्र न्या. भूषण गवई व न्या. सूर्यकांत हे सहकारी होते. याच खंडपीठावर जमैकाचे सरन्यायाधीश ब्रायन स्यॅक्स व भूतानच्या सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश न्या. कुएन्ले त्सेहरिंग यांनी स्थानापन्न होऊन काही काळ कामकाज न्याहाळले. न्या. बोबडे यांच्या कामकाज सुरू होण्यापूर्वी तातडीने सुनावणीसाठी आलेल्या विषयात आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटकेत असलेले माजी वित्तमंत्री चिदम्बरम यांच्या जामीन अर्जाचा समावेश होता. उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्याने चिदम्बरम यांनी अपील केले आहे. प्रकृती ठीक नसूनही चिदम्बरम गेले ९० दिवस कोठडीत आहेत, असे अ‍ॅड. कपिल सिब्बल यांनी सांगितल्यावर न्या. बोबडे यांनी ‘उद्या वा परवा सुनावणीला लावू’, असे सांगितले.संक्षिप्त जीवनपटजन्म : २४ एप्रिल १९५६, नागपूरशिक्षण : बी.ए., एलएल.बी., नागपूर विद्यापीठवकिली : सन १९७८ मध्ये सनद. २१ वर्षे मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात वकिली. १९९८ मध्ये ‘सिनिअर कौन्सिल’ म्हणून नामांकन.न्यायाधीशपद : २९ मार्च २००० रोजी मुंबई उच्च न्यायालयावर नियुक्ती. १६ जानेवारी २०१२ रोजी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपद. १२ एप्रिल २०१२ रोजी सर्वोच्च न्यायालयावर नियुक्ती.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय