राज्यातील 4 स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान
By Admin | Updated: August 10, 2014 02:14 IST2014-08-10T02:14:20+5:302014-08-10T02:14:20+5:30
‘भारत छोडो आंदोलन’ आणि ‘गोवा मुक्ती संग्रामा’त बहुमोल योगदान देणा:या महाराष्ट्रातील चार स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान शनिवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते करण्यात आला.

राज्यातील 4 स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान
>नवी दिल्ली : ‘भारत छोडो आंदोलन’ आणि ‘गोवा मुक्ती संग्रामा’त बहुमोल योगदान देणा:या महाराष्ट्रातील चार स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान शनिवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते करण्यात आला.
‘भारत छोडो आंदोलन-वर्धापन दिन 9 ऑगस्ट’निमित्त राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते देशभरातील स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करण्यात आला. या सत्कारमूर्तीमध्ये महाराष्ट्रातील प्रभाकर भुर्के (जि. सातारा), बिपीनकांतसिंह गौर (जि. गोंदिया), सय्यद आजम सय्यद हुसेन (जि. परभणी) आणि कांचनलाल कंसारा (जि. नाशिक) यांचा समावेश होता. मुंबई येथील स्वातंत्र्यसैनिक द्वारकादास मेहता यांचाही सन्मान होणा:यांच्या यादीत समावेश होता. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे या कार्यक्रमास ते उपस्थित राहू शकले नाहीत. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, केंद्रीय गृहमंत्नी राजनाथ सिंह, आसामचे मुख्यमंत्नी तरुण गोगोई यांच्यासह अनेक गणमान्य व्यक्ती या शानदार सोहळ्याला उपस्थित होत्या.
सातारा जिल्ह्यातील कराड येथील स्वातंत्र्यसैनिक प्रभाकर भुर्केयांनी इयत्ता सातवीत असताना ब्रिटिश शासनाच्या दडपशाहीच्या निषेधार्थ शाळेत बैठा संप पुकारला. भुर्के यांचा चळवळीतील सहभाग पाहता त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले व अशा प्रकारे ते चळवळीत आले. प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक माधवराव जाधव यांच्याबरोबर 25 जानेवारी 1944 रोजी कराड येथील चावडी चौकात पत्नक चिकटवत असताना भुर्केयांना पुन्हा अटक करण्यात आली. तीन महिन्यांनी त्यांची सुटका झाली. याच काळात बाबासाहेब गरवारे व शिरवडे येथील शहा यांच्या बंदुका लुटल्या. यासाठी त्यांना कराड तालुक्यात फरारी घोषित केले. कराड तालुका स्वातंत्र्यसैनिक सहकारी पतसंस्था व संघटना या दोन्ही संस्थात कार्यकारी सदस्य म्हणून आजही भुर्के कार्यरत आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश स्वातंत्र्यसैनिक महासंघ स्थापन झाल्यानंतर कराड तालुका स्वातंत्र्यसैनिक संघटनेमार्फत सभासद म्हणून व सध्या कार्यकारिणी सदस्य म्हणूनही भुर्के कार्यरत आहेत.
तत्कालीन भंडारा जिल्ह्यातील तिरोडा येथील रहिवासी बिपिनकांत सिंह गौर यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य 1942च्या ‘भारत छोडो आंदोलना’त सक्रिय सहभागी होते. जिल्ह्यातील गौर हे एकमेव कुटुंब होते ज्यातील सर्व सदस्यांनी तुरुंगवास भोगले. त्यांचे वडील बरजोरसिंह व आई कौशल्यासिंह गौर यांनाही 193क् आणि 1932मध्ये स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतल्याबद्दल तुरु ंगात डांबण्यात आले होते. बिपिनकांत सिंह यांनी वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेऊन अहिंसात्मक आंदोलनाचा मार्ग अवलंबला. या वेळेस त्यांना साडेसात महिन्यांचा कारावास झाला. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी ग्रामोद्योगाची कास धरून खादी ग्रामोद्योगासाठी कार्य केले.
परभणीचे सय्यद आजम सय्यद हुसैन यांनी ‘गोवा मुक्ती संग्रामा’त मोलाचे योगदान दिले. 19 ऑगस्ट 1955 रोजी भर पावसात त्यांनी इब्राहीमपूर येथे गोवा विमोचन समितीतर्फे पुकारण्यात आलेल्या सत्याग्रह आंदोलनात सहभाग नोंदविला. गोवा विमोचन समितीचे नेते जयवंतराव टिळक, एस.एम. जोशी व बॅ. नाथ पै हे धुरीण या मोर्चाचे नेतृत्व करत होते. पोलिसांनी हा सत्याग्रह मोडून काढण्यासाठी लाठीहल्ला व गोळीबार केला. यास न जुमानता सय्यद आजम सय्यद हुसैन यांनी राष्ट्रीयध्वज स्वाभिमानाने उंचावत 2क् सत्याग्रहींच्या तुकडीचे खंबीर नेतृत्व केले. नाशिकचे कांचनलाल त्रिबंकभाई कंसारा यांनी वयाच्या 14व्या वर्षी 1942च्या आंदोलनात भित्तीपत्नके चिटकविणो, मोर्चे काढणो आदी माध्यमातून आंदोलनात सहभाग घेतला. यासाठी त्यांनी आठ वेळा तुरु ंगवासही सोसला. (विशेष प्रतिनिधी)