केवळ 'एसी'मध्ये झोपण्यासाठी हा पठ्ठ्या चोरायचा होंडा सिटी

By Admin | Updated: September 22, 2016 17:26 IST2016-09-22T17:25:31+5:302016-09-22T17:26:05+5:30

दिल्लीच्या कृष्णा नगर पोलिसांनी एका 'शाही चोराला' अटक केली आहे. या चोराची चोरी करण्याची पद्धत बरीच वेगळी

Honda City, a staggering idol of sleeping in the AC only | केवळ 'एसी'मध्ये झोपण्यासाठी हा पठ्ठ्या चोरायचा होंडा सिटी

केवळ 'एसी'मध्ये झोपण्यासाठी हा पठ्ठ्या चोरायचा होंडा सिटी

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि.22- दिल्लीच्या कृष्णा नगर पोलिसांनी एका 'शाही चोराला' अटक केली आहे. या चोराची चोरी करण्याची पद्धत बरीच वेगळी आहे. हा पठ्ठ्या फक्त होंडा सिटी कार चोरायचा आणि चोरीही फक्त एसीमध्ये झोपण्यासाठी आणि मौजमस्ती करण्यासाठी करायचा. 
 
त्याच्या स्वतःच्या घरात एसी नव्हता म्हणून केवळ एसीमध्ये झोपण्यासाठी तो चोरी करायचा. बरं चोरी करताना फक्त तो होंडा सिटी कार चोरायचा कारण त्याच्या म्हणण्यानुसार होंडासिटीचा एसी बाकी गाड्यांच्या तुलनेत जास्त ताकदीचा असतो. विशेष म्हणजे चोरलेल्या कारमध्ये पेट्रोल भरायची वेळ यायची तेव्हा हा पठ्ठ्या स्कूटी चोरी करायचा. त्याला एका स्कूटी चोरी प्रकरणात सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलिसांनी अटक केली.
 
अमृत सिंग उर्फ डॉन असं या चोराचं नाव आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे तो केवळ 19 वर्षांचा आहे. अमृतकडून पोलिसांनी 5 होंडा सिटी कार आणि 2 स्कूटी जप्त केल्या आहेत. वय जरी कमी असलं तरी त्याच्यावर 16 गुन्हे दाखल आहेत आणि याआधी एकदा त्याला अटकही झाली होती. 
 
'नवभारत टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, केवळ मौजमजेसाठी चोरी करायची, दिल्लीच्या रस्त्यांवर दिवसभर कार तुफान पळवायची, पेट्रोल संपलं की परत स्कूटी चोरायची आणि रात्र झाली की कारचा एसी सुरू करून झोपायचं असा याचा दिनक्रम होता.   

Web Title: Honda City, a staggering idol of sleeping in the AC only