भाजपाच्या ‘पाठशाळे’त खासदारांना गृहपाठ
By Admin | Updated: July 1, 2014 12:45 IST2014-07-01T02:20:54+5:302014-07-01T12:45:16+5:30
टेक्नो सॅव्ही व्हा, स्वत:च्या आवडीच्या कोणत्याही दोन विषयांत प्रावीण्य मिळवा, मतदारसंघातील विकासकामांचा पुढच्या सहा महिन्यांचा विकासतक्ता तयार करा.

भाजपाच्या ‘पाठशाळे’त खासदारांना गृहपाठ
>रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
टेक्नो सॅव्ही व्हा, स्वत:च्या आवडीच्या कोणत्याही दोन विषयांत प्रावीण्य मिळवा, मतदारसंघातील विकासकामांचा पुढच्या सहा महिन्यांचा विकासतक्ता तयार करा. आणि आपल्या राज्यासह अन्य राज्यातील किमान शंभर खासदारांशी सुसंवाद वाढविणारी ओळख ठेवा.!! भारतीय जनता पार्टीच्या नव्या खासदारांना हा कानमंत्र भाजपा व संघाच्या वरिष्ठ नेत्यांनी, सरकारातील ज्येष्ठ मंत्र्यांनी दिला. दोन दिवसांच्या बौध्दिकानंतर महाराष्ट्रातील बारा नवे खासदार श्रवणतृप्त झाले.
पहिल्यांदाच विजयी झालेल्या भाजपाच्या खासदारांसाठी हरियाणाच्या फरिदाबाद जिल्ह्यातील सुरजकुंड येथे शनिवार व रविवारी झालेल्या ‘पाठशाळे’चे हे फलित आहे. हा अभ्यासवर्ग संपत नाही तोच लोकसभा सचिवालयाने या खासदारांना संसदीय कार्यपध्दती समजावून सांगण्यासाठी सोमवारी कार्यशाळा ठेवली. त्यामुळे सारेच पाटीलेखन घेऊन अभ्यास करण्यासाठी व्यग्र असल्याचे चित्र राजधानीत दिसत आहे. नव्या खासदारांना हे सारे समजून घ्यायचे आहे, हे त्यांच्या देहबोलीतून स्पष्ट दिसते. काहींना हा विषय जुना वाटतो. काहींना भाषणबाजी वाटली,पण तंत्रज्ञानाची जोड अभ्यासासोबत जोडली गेल्याने सध्या तरी विद्याथ्र्याच्या भूमिकेतून खासदार वागताना दिसत आहेत.
आपल्या विकासकामांबाबत माध्यमांशी मुक्तपणो बोला. ट¦ीटर, फेसबूक आणि जनसामान्यांशी संवाद साधणा:या सर्व माध्यमांवर सक्रिय राहा, असे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रातील खासदारांनी ‘पाठशाळे’तून काय मिळवले याचा ‘लोकमत’ने धांडोळा घेतला तेव्हा प्रत्येकाने नवी माहिती दिली.
आम्हाला पत्रकारांना सांगण्यास मनाई केली आहे, असे एकीने सांगितले खरे पण अभ्यासवर्ग खूप प्रेरणादायी होता. खासदार म्हणून किती मोठी जबाबदारी आपल्यावर आहे, याची जाणीव पदोपदी झाली, असे सांगितले.
आठ विषयांवर केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, अरूण जेटली, सुषमा स्वराज, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, माजी केंद्रीय मंत्री राम नाईक, पार्टीच्या प्रशिक्षण वर्गाचे प्रमुख आलोककुमार, संघटनमंत्री रामलाल व रामभाऊ म्हाळगी प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक विनय सहस्त्रबुध्दे यांनी मार्गदर्शन केले.
4मतदारसंघ, व्यक्तिमत्त्व विकास व देश घडविण्यासाठी अभ्यासवर्ग फलदायी ठरला.
-खा. पूनम महाजन,
उत्तर-मध्य, मुंबई
शिस्त शिकायला मिळाली. पक्ष व स्वत:ची प्रतिमा कशी जपायची. ते कळले.
- खा. रक्षा खडसे, रावेर
प्रश्न कसे विचारायचे, ङिारो अवरपासून ते प्रश्नकालार्पयत सारी चर्चा अगदी नवी होती.
- खा. कपिल पाटील, भिवंडी
अभ्यासवर्गातून लोकसभेचे कामकाज कसे करायचे ते कळले. वेगळा अनुभव आहे.
-खा. गोपाळ शेट्टी,
उत्तर मुंबई
मोठय़ांचे अनुभव ऐकले. नव्याना जे अपेक्षित असते, ते सारेच त्यातून मिळाले.
- खा. शरद बनसोडे, सोलापूर
अभ्यासवर्गाने नव्या खासदारांना आपण कशासाठी व का याबाबतची वैचारिक स्पष्टता झाली. -विनय सहस्त्रबुध्दे
शंभर खासदारांशी ओळख ठेवा
दोन विषयांत प्रावीण्य मिळवा
सहा महिन्यांचा विकासतक्ता
पार्टीकडून सदनात विषयांवर बोलायची तयारी
लोकांच्या अपेक्षांना गृहीत धरू नका
उत्कृष्ट संसदपटू होण्यासाठी तयारी
प्रश्नाचा तळ गाठा
समस्येचा पाठपुरावा
ग्रंथालयाचा पुरेपूर वापर
टि¦टर, फेसबुकचा वापर