शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
4
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
5
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
6
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
7
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
8
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
9
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
10
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
11
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
12
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
13
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
14
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
15
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
16
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! 'या' कंपनीशी कुठलाही व्यवहार करू नका; अन्यथा पश्चाताप होईल, सेबीचा इशारा!
18
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
19
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
20
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा

Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 17:04 IST

Bhargavastra : 'भार्गवास्त्र' नावाची ही हार्ड किल मोड काउंटर ड्रोन प्राणाली  'सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड एसडीएएल'ने डिझाईन आणि विकसित केली आहे.

भारताने नुकतेच पाकिस्तानचे नापाक दहशतवादी हेतू हाणून पाडले आहेत. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं उत्तर देण्यासाठी भारताने 'ऑपरेशन सिंदूर' करत पाकिस्तानातील दहशतवादी तळं नष्ट केली. यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ले केले. मात्र, भारतीय सैन्याने हे हल्ले परतवून लावले. या संघर्षादरम्यान अवघ्या जगाने भारताची क्षेपणास्त्र ताकद पाहिली. आता भारताची हीच ताकद आणखी मजबूत करण्यासाठी सैन्याच्या ताफ्यात 'भार्गवास्त्र'ची एन्ट्री झाली आहे.

हवाई हल्ल्यांदरम्यान ड्रोनच्या ताफ्यांपासून होणारा धोका रोखण्यासाठी भारताकडे आता एक नवीन आणि कमी खर्चिक उपाय आला आहे. 'भार्गवास्त्र' नावाची ही हार्ड किल मोड काउंटर ड्रोन प्राणाली  'सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड एसडीएएल'ने डिझाईन आणि विकसित केली आहे. त्याची पहिली चाचणी आज यशस्वीरित्या पार पडली आहे. ओडिशाच्या गोपाळपूर येथील सीवर्ड फायरिंग रेंजमध्ये त्याची चाचणी घेण्यात आली. 'भार्गवास्त्र' ही प्रणाली सूक्ष्म रॉकेटद्वारे ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे. विशेषतः ड्रोनच्या धोक्यांना रोखण्यासाठी ही प्रणाली विकसित केली गेली आहे.

पहिली चाचणी यशस्वी!

'भार्गवास्त्र' प्रणालीच्या मायक्रो रॉकेट्सची चाचणी १३ मे २०२५ रोजी ओडिशातील गोपाळपूर येथील सीवर्ड फायरिंग रेंजमध्ये करण्यात आली. यावेळी भारतीय लष्कराचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. याच्या एकूण तीन चाचण्या घेण्यात आल्या. दोन चाचण्यांमध्ये, प्रत्येकी एक रॉकेट सोडण्यात आले, तर एका चाचणीत फक्त दोन सेकंदांच्या फरकाने सॅल्व्हो मोडमध्ये दोन रॉकेट सोडण्यात आले. चारही रॉकेट अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत, सर्व चाचणी मापदंड पूर्ण केले.

काय आहे 'भार्गवस्त्रा'ची खासियत?'भार्गवास्त्र' हे मानवरहित हवाई वाहन (UAV) धोक्यांचा सामना करण्यासाठी सक्षम आहे. यात द्वि-स्तरीय मारक यंत्रणा आहे. याच्या पहिल्या थरात दिशाहीन मायक्रो रॉकेट्स तैनात केले आहेत, जे २० मीटरच्या अंतरातील ड्रोनच्या ताफ्याला उद्ध्वस्त करण्यात सक्षम  आहे. याचा मारक पल्ला २.५ किमीपर्यंत आहे. तर, दुसऱ्या थरामध्ये अचूक लक्ष्य साधणारं मार्गदर्शित सूक्ष्म क्षेपणास्त्र आहे. 

एसडीएएलने विकसित केलेली ही प्रणाली मॉड्यूलर आणि भूप्रदेशाशी जुळवून घेणारी असून, ५००० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या प्रदेशात देखील कार्य करण्यास सक्षम आहे. यामुळे ती भारतीय सशस्त्र दलांच्या मोहिमांमध्ये मोठी भूमिका बजावू शकते. 'भार्गवास्त्र'चे रडार ६ ते १० किमी अंतरावरील लो रडार क्रॉस-सेक्शनमध्ये (LRCS) हवाई लक्ष्ये शोधू शकते. नावात काय आहे खास?'भार्गवास्त्र'च्या नावही खास आहे. महाभारतात काही विध्वंसक अस्त्र वापरले गेले होते. यापैकी एक भार्गवास्त्र देखील होते, ज्याचे नाव महर्षी भार्गव परशुराम यांच्या नावावर ठेवण्यात आले होते. आता या नावापासून प्रेरणा घेऊन, भारताने एक अत्याधुनिक सूक्ष्म-क्षेपणास्त्र आधारित काउंटर-ड्रोन प्रणाली विकसित केली आहे. भारताच्या ताफ्यात सामील झालेले हे नवीन 'भार्गवास्त्र' आधुनिक युद्धात देशाच्या सुरक्षेला एका नवीन उंचीवर नेण्यासाठी सज्ज आहे. 

टॅग्स :Defenceसंरक्षण विभागindian air forceभारतीय हवाई दलIndian Armyभारतीय जवान