सोय असेल तर कोरोना रुग्णांवर घरीच उपचार - आरोग्य विभाग
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 06:40 IST2020-06-08T06:39:46+5:302020-06-08T06:40:26+5:30
आरोग्य विभाग : मार्गदर्शक सूचना

सोय असेल तर कोरोना रुग्णांवर घरीच उपचार - आरोग्य विभाग
मुंबई : घरी सुविधा असतील आणि रुग्णाची परवानगी असेल, तर अति सौम्य लक्षणे असलेल्या, तसेच लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांवर घरीच उपचाराचे धोरण राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने स्वीकारले आहे.
घरीच उपचार आणि विलगीकरणाबाबतचे आदेश आणि मार्गदर्शक सूचना आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी जारी केल्या आहेत. एखाद्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णात लक्षणे नाहीत किंवा अतिसौम्य लक्षणे असतील, तर त्यांच्यावर घरीच उपचाराची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी घरी सर्व आवश्यक सुविधा गरजेच्या आहेत. डॉक्टरांकडून प्रमाणपत्र मिळाल्यानंतर घरीच विलगीकरण करता (पान ६वर)
ही घ्या काळजी
च्घरीच विलगीकरणात राहायचे असेल, तर संबंधित कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या चोवीस तास देखभालीसाठी अन्य एखादी व्यक्ती उपलब्ध असायला हवी.
च्नियंत्रण कक्ष तसेच सर्वेक्षण पथकाशी संपर्कासाठी मोबाईल असायला हवा. वैद्यकीय सल्ल्यानुसार निकट सहवासित किंवा काळजीवाहूंना औषधे घ्यावी लागणार आहेत.