शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनावरून जनतेत भ्रम निर्माण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न, अमित शाह यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 20:44 IST

काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांनी नुकताच, सरकारवर लॉकडाऊन करण्यापूर्वी कुठल्याही प्रकारचे नियोजन केले नव्हते, यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला, असा आरोप केला होता. हाच धागा पकडत शाह यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधींनी लॉकडाऊनपूर्वी सरकारने येग्य नियोजन केले नसल्याचे म्हटले होतेशाह यांनी ट्वट करत काँग्रेसवर आरोप केला आहेकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी आज सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला

नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरूवारी काँग्रेसवर निषाणा साधला. विरोधी पक्ष कोरोना व्हायरसच्या मुद्यावरून क्षुद्र राजकारण करत आहे. त्यांनी जनतेच्या मनात भ्रम निर्माण करण्यापेक्षा देशाच्या हिताचा विचार करायला हवा, असे शाह यांनी म्हटले आहे.

काँग्रेसाध्यक्षसोनिया गांधी यांनी नुकताच, सरकारवर लॉकडाऊन करण्यापूर्वी कुठल्याही प्रकारचे नियोजन केले नव्हते, यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला, असा आरोप केला होता. हाच धागा पकडत शाह यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. शाह यांनी ट्वट करून केला आरोप -यासंदर्भात गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करत म्हटले आहे, की 'पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वात कोरोना व्हायरसविरोधातील लढ्याचे देश आणि जागतीक पातळीवर कौतुक होत आहे. 130 कोटी भारतीय कोरोनावर मात करण्यासाठी एकत्र आले आहेत.  असे असतानाही, काँग्रेस क्षुद्र राजकारण करत आहे. त्यांनी देश हिताचा विचार करावा आणि लोकांमध्ये भ्रम निर्माण करणे सोडावे.'

पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद -देशात वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत चर्चा केली. तसेच पंतप्रधानांनी यावेळी काही सल्लेही दिले.

यावेळी मोदींनी देशातील लॉकडाऊनच्या स्थितीविषयी चिंता व्यक्त केली. राज्यांनी जनतेकडून लॉकडाऊनची कठोरपणे पालन करून घ्या, अशी सूचना त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिली. तसेच लोकांना जीवनावश्यक वस्तूंची टंचाई भासणार नाही याची काळजी राज्यांनी घ्यावी. तसेच ज्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे दिसतील, अशा व्यक्तींना आयसोलेशन वॉर्डमध्ये पाठवावे, तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटईन करावे. क्वारंटाईन वॉर्ड वाढवावे लागले तर वाढवावेत, अशा सूचना यावेळी मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmit Shahअमित शहाSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीNarendra Modiनरेंद्र मोदी