Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 20:16 IST2025-04-28T20:15:01+5:302025-04-28T20:16:34+5:30
Padma Awards 2025 List: भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी क्रिकेटपटू आर अश्विन यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. अश्विनसह इतर अनेक खेळाडूंना पद्म पुरस्कार देण्यात आला आहे.

Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून गेल्या वर्षी निवृत्ती घेतलेला भारतीय क्रिकेटपटू आर. अश्विनसाठी आजचा दिवस खास ठरला आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अश्विनसह इतर अनेक खेळाडूंना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, ज्यात भारतीय हॉकीपटू आर श्रीजेश यांचेही नाव आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात आर. अश्विनला पद्म पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी राष्ट्रपती भवनात पंतप्रधान मोदींसह अनेक मोठे दिग्गज उपस्थित होते. हा पुरस्कार मिळवणारा अश्विन ४० वा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी झहीर खान, सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर यांच्यासह अनेक खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात आला.
उत्कृष्ट फिरकीपटू
अश्विन हा भारतासाठी क्रिकेट खेळलेल्या महान भारतीय फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे. गेल्या वर्षी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या बॉक्सिंग डे कसोटीनंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. अश्विन सध्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंगकडून खेळत आहे.
भारतीय हॉकी इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडू
पीआर श्रीजेश यांना भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषणने सन्मानित करण्यात आले. गेल्या वर्षी हॉकीमधून निवृत्त झालेल्या या महान हॉकीपटूला भारतीय हॉकी इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक मानले जाते. पुरुष हॉकीमध्ये भारताला सलग दोन ऑलिंपिक पदके जिंकून देण्यात श्रीजेशने महत्त्वाची भूमिका बजावली.
पद्म पुरस्कारांची संपूर्ण यादी
पद्मविभूषण:
- दुव्वुर नागेश्वरा रेड्डी
- माजी सरन्यायाधीश जगदीश सिंग खेहर
- कुमुदिनी रजनीकांत लखिया
- लक्ष्मीना
- रायन सुब्रमण्यम
- एम.टी. वासुदेवन नायर (मरणोत्तर)
- ओसामु सुझुकी (मरणोत्तर)
- शारदा सिन्हा (मरणोत्तर)
पद्मभूषण:
- ए. सूर्य प्रकाश
- अनंता नाग
- बिबेक देबरॉय (मरणोत्तर)
- जतिन गोस्वामी
- जोस चाको पेरियाप्पुरम
- कैलाश नाथदीक्षित
- मनोहर जोशी (मरणोत्तर)
- नल्ली कुप्पुस्वामी चेट्टी
- नंदमुरी बालकृष्ण
- पी.आर. श्रीजेश
- पंकज पटेल (मरणोत्तर)
- पंकज उधास (मरणोत्तर)
- रामबहादुर राय
- साध्वी ऋतंभरा
- एस अजित कुमार
- शेखर कपूर
- शोभना चंद्रकुमार
- सुशील कुमार मोदी (मरणोत्तर)
- विनोद धाम