शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

West Bengal Assembly Elections 2021: बंगालमध्ये "अबकी बार 200 पार" कसा पोहोचणार भाजप? अमित शाहंनी समजून सांगितलं गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 12:35 IST

अमित शाह यांनी हिंदुस्तान टाइम्ससोबत बोलताना सांगितले, की भाजप 200 पारची घोषणा कशा पद्धतीने यशस्वी करेल. अमित शाह म्हणाले, आम्ही 2019च्या लोकसभा निवडणुकीत 18 जागा जिंकल्या, तेव्हाही कुणाला विश्वास नव्हता. (West Bengal Assembly Elections 2021)

कोलकाता - पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 'अबकी बार, 200 पार', अशी घोषणा दिली आहे. ओपीनियन पोल्समध्ये भाजपला अनपेक्षित यश मिळेल, असे सांगण्यात आले असले तरी, यात भाजपला 200च्या आकड्यापासून बरेच दूर ठेवले आहे. असे असताना भाजप या आकड्याच्या पुढे कसा जाईल? यावर खुद्द गृहमंत्री अमित शाह (Amit shah) यांनीच भाजपचा प्लॅन शेअर केला आहे. (Amit shah told how bjp will fulfill the slogan of abki baar 200 paar in bengal)

अमित शाह यांनी हिंदुस्तान टाइम्ससोबत बोलताना सांगितले, की भाजप 200 पारची घोषणा कशा पद्धतीने यशस्वी करेल. अमित शाह म्हणाले, आम्ही 2019च्या लोकसभा निवडणुकीत 18 जागा जिंकल्या, तेव्हाही कुणाला विश्वास नव्हता. त्या जागांवर आलेल्या निकालांचे रुपांतर विधानसभेत केले, तरी आम्ही 200च्या पुढे जातो. 

West Bengal Assembly Elections 2021 : 'रमजान अन् ख्रिसमसला आमचा विरोध नाही, मग सरस्वती, दुर्गा पूजाही व्हायलाच हवी'

बंगालमध्ये 200 प्लस जागांवर भाजपचा विजय -अमित शाह यांनी 294 विधानसभा जागा असलेल्या पश्चिम बंगालमध्ये आपल्या पक्षासाठी 200 प्लस जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यावर बोलताना, शाह म्हणाले, आमच्या या दाव्यावर कुणालाही शंका असेल तर ते 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल पाहू शकतात. जेथे आमचे दोन खासदार वाढून 18 झाले आणि व्होट शेअर तृणमूल काँग्रेसच्या जवळपास झाले आहे.

'आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय निश्चित' -आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय निश्चित असल्याचा अमित शाह यांना विश्वास आहे. याशिवाय तामिळनाडूतही भाजप-अन्नाद्रमूक युतीचा विजय होईल तसेच केरळ आणि पुदुचेरीमध्ये भाजपच्या जागा वाढतील. अशी आशा शाह यांनी यावेळी व्यक्त केली.

West Bengal Assembly Elections: पश्चिम बंगालचा ओपिनिअन पोल बदलला; भाजपा-ममतांमध्ये 'कांटे की टक्कर', काँग्रेस किंगमेकर

'टीएमसीचे कॅम्पेन कमकुवत' -आपण म्हटले आहे, की पश्चिम बंगालमध्ये भाजपला 200 हून अधिक जागा मिळतील. ते लक्ष्य साध्य करण्यासाठी आपण काय करत आहात? असा प्रश्न विचारला असता, शाह म्हणाले, पश्चिम बंगालमधील लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्याच्या विकासाचा दृष्टिकोण स्वीकारला आहे. राज्यात 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 18 जागा जिंकल्या होत्या. आप भाजपची ही कामगिरी विधानसभांशी जोडली, तर आपल्याला सहज समजेल, की आम्ही हा आकडा कसा निर्धारित केला आहे. लोकसभेत 18 जागा जिंकल्यानंतर आमचा विश्वास वाढला आहे, की भाजप निश्चितपणे जिंकू शकतो. तसेच टीएमसीच्या अनेक नेत्यांनी पक्ष सोडल्याने त्यांचे कॅम्पेनदेखील कमकुवत झाले आहे, असेही शाह म्हणाले. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१west bengalपश्चिम बंगालBJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेसAmit Shahअमित शहा