शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Jammu And Kashmir : मोठं यश! हिज्बुल मुजाहिदीनच्या टॉप कमांडरचा खात्मा, एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2020 17:33 IST

Jammu And Kashmir : श्रीनगरमध्ये भारतीय सैन्य, जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफने केलेल्या जॉईंट ऑपरेशनमध्ये दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आले आहे.

श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे. हिज्बुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडरचा (Hizbul Mujahideen Chief Commander) खात्मा करण्यात आला आहे. सैफुल्लाह असं दहशतवाद्याचं नाव आहे. श्रीनगरमध्ये भारतीय सैन्य, जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफने केलेल्या जॉईंट ऑपरेशनमध्ये दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आले आहे. तर एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दल आणि जम्मू काश्मीर पोलिसांना श्रीनगरच्या रंगरेथ परिसरात हिज्बुल मुजाहिद्दीनचे दोन टॉप दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच राष्ट्रीय रायफल्स, जम्मू-काश्मीर पोलिसांची एसओजी आणि सीआरपीएफच्या जवानांनी एक जॉईंट ऑपरेशन सुरू केले. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले.

जॉईंट ऑपरेशनमध्ये हिज्बुलचा टॉप कमांडर सैफुल्लाह उर्फ गाजी हैदरचा खात्मा करण्यात यश आलं आहे. जम्मू-काश्मीर आयजी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही ऑपरेशन दरम्यान सैफुल्लाह नावाच्या एका कमांडरचा खात्मा केला आहे. त्याची ओळख पटवण्यात येत आहे. मात्र तो 95 टक्के सैफुल्लाह असल्याची आमची खात्री आहे. तसेच एका दहशतवाद्यालाही अटक करण्यात आली आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

जम्मू-काश्मीरच्या कथुआमध्ये पाकिस्तानचा गोळीबार, भारताकडून चोख प्रत्युत्तर

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी रेंजर्सनी युद्धबंदीचे उल्लंघन करीत जम्मू-काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवरील अग्रिम चौक्या तसेच गावांवर गोळीबार केला होता. संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाकच्या हल्ल्यात भारतीय बाजूने कसलेही नुकसान झालेले नाही. हिरानगर सेक्टरच्या चंदवा, मयारी व फकिरामध्ये पाकिस्तानच्या बाजूने गोळीबार करण्यात आला. याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले. 

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीIndian Armyभारतीय जवानHizbul Mujahideenहिज्बुल मुजाहिद्दीनPoliceपोलिस