हिवरे खुर्द ग्रामपंचायत सरपंचपदी कैलास जाधव
By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:34+5:302015-08-26T23:32:34+5:30
ओतूर : जवळच असलेल्या हिवरे खुर्द (ता. जुन्नर) ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचांची निवडणूक नुकतीच झाली.

हिवरे खुर्द ग्रामपंचायत सरपंचपदी कैलास जाधव
ओ ूर : जवळच असलेल्या हिवरे खुर्द (ता. जुन्नर) ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचांची निवडणूक नुकतीच झाली.या निवडणुकीत सरपंचपदासाठी भैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे कैलास किसन जाधव व विरोधी पॅनलचे पांडुरंग नारायण वायकर असे दोन अर्ज आले होते. त्यासाठी मतदान घेण्यात आले. कैलास जाधव यांना ५ मते मिळाल्याने ते विजयी झाले. पांडुरंग वायकर यांना ३ मते मिळाली. उपसरपंचपदासाठी अशोक खंडू वायकर यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे अशोक वायकर हे उपरपंचपदी बिनविरोध निवडून आले.या निवडणुकीचे निवडणूक अधिकारी म्हणून जुन्नरचे नायब तहसीलदार माळी यांनी काम पाहिले. त्यांना तलाठी श्रीमती चव्हाण, ग्रामसेविका खंडे यांनी सहकार्य केले.या वेळी भैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे प्रमुख व भैरवनाथ ट्रस्टचे अध्यक्ष दत्तूशेठ वायकर, अश्वमेध युवा मंचचे अध्यक्ष गणेश कवडे, रवींद्र येंधेे, हरिशेठ औटी, जनार्दन वायकर, पांडूशेठ वायकर, रामदास येंधे, दिलीप वायकर, अरुण येंधेे, देवराम येंधेे, बाबाजी वायकर, रामदास जाधव, कैलास वायकर सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.