एचआयव्ही
By Admin | Updated: August 19, 2015 22:27 IST2015-08-19T22:27:36+5:302015-08-19T22:27:36+5:30
पणजी : एचआयव्ही-एड्स संदर्भात समाजात जागृती करण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ‘हेल्प’ या मोबाईल अँपची निर्मिती केली आहे. आयुषमंत्री र्शीपाद नाईक यांच्या हस्ते या अँपचे उद्घाटन करण्यात आले.

एचआयव्ही
प जी : एचआयव्ही-एड्स संदर्भात समाजात जागृती करण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ‘हेल्प’ या मोबाईल अँपची निर्मिती केली आहे. आयुषमंत्री र्शीपाद नाईक यांच्या हस्ते या अँपचे उद्घाटन करण्यात आले.बांबोळी येथील कृष्णदास शामा मुखर्जी स्टेडियमवर हा कार्यक्रम बुधवारी पार पडला. या वेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, उपमुख्यमंत्री फ्र ान्सिस डीसोझा, आमदार विष्णू वाघ, मंत्री रमेश तवडकर उपस्थित होते.या वेळी नाईक म्हणाले की, एचआयव्ही सारख्या गंभीर रोगाबाबत समाजात जागृती निर्माण करण्याची आवश्यकता आहे. या अँपच्या माध्यमातून 11 कोटी लोकांपर्यंत माहिती पोहचविण्याचा उद्देश आहे. देशात 1986 साली एड्सचा पहिला रुग्ण आढळून आला आणि याकडे सरकारने गंभीरपणे पाहण्यास सुरुवात केली. एड्स कृती दलाची निर्मिती करून 1992 मध्ये पहिला एड्स नियंत्रक कार्यक्रम राबविण्यात आला. राष्ट्रीय एड्स नियंत्रक संस्थे(नॅको)ची स्थापना केली व 1992 मध्ये कार्यक्रमाचा दुसरा टप्पा राबविण्यात आला व यात राज्य एड्स नियंत्रक संस्थांची स्थापना केली. देशात 700 एआरटी केंद्रे असून या माध्यमाव्दारे दोन कोटी लोकांची तपासणी केली जाते. युवकांना केंद्रस्थानी ठेवून सरकारने प्रत्येक महाविद्यालयात रेड रिबीन क्लब स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. एचआयव्ही मुक्त भारत निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जात असल्याचे ते या वेळी म्हणाले.मुख्यमंत्री म्हणाले की, भारतात एचआयव्हीचे प्रमाण कमी होत आहे. हे प्रमाण कमी होऊन थांबणार नाही, तर देशात एचआयव्हीचे प्रमाण शून्य करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी युवा वर्गाचा मोठा वाटा असून युवा वर्गात जागृती होणे आवश्यक आहे. हेल्प अँप प्रत्येकाकडे पोहचले पाहिजे आणि यात दिलेली माहिती प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे.