हिटलर आणि मुसोलिनीदेखील ब्रॅण्ड होते, राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

By Admin | Updated: January 14, 2017 17:17 IST2017-01-14T17:17:10+5:302017-01-14T17:17:10+5:30

राहुल गांधींनी हिटलर आणि मुसोलिनीदेखील ब्रॅण्ड होते असं म्हणत मोदींची हिटलरशी तुलना केली आहे

Hitler and Mussolini were brands too, Rahul Gandhi's target on Modi | हिटलर आणि मुसोलिनीदेखील ब्रॅण्ड होते, राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

हिटलर आणि मुसोलिनीदेखील ब्रॅण्ड होते, राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - हरियाणा राज्य सरकारचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांनी खादी ग्रामोद्योग कॅलेंडरवरुन केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी टोला हाणत टीका केली आहे. खादीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महात्मा गांधींपेक्षा मोठा ब्रॅण्ड आहेत असं वक्तव्य अनिल वीज यांनी केलं होतं. यावर टीका करत राहुल गांधींनी हिटलर आणि मुसोलिनीदेखील ब्रॅण्ड होते असं म्हणत मोदींची हिटलरशी तुलना केली आहे. 
 
(आनंदी आनंद गडे... मोदीच मोदी चहूकडे!)
 
खादी ग्रामोद्योगाच्या कॅलेंडर आणि डायरीनंतर आता नोटेवरुनही महात्मा गांधींचं छायाचित्र हटवण्यात येईल असं खळबळजनक वक्तव्य करत अनिल वीज यांनी नवा वाद निर्माण केला होता. खादीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महात्मा गांधींपेक्षा मोठा ब्रॅण्ड आहेत', असंही अनिल वीज बोलले. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी खादी उद्योगाशी जोडले गेले तेव्हापासून विक्रीत 14 टक्क्यांनी वाढ झाल्याचंही', अनिल वीज यांनी सांगितलं. अंबाला येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. 
 
'खादी ही महात्मा गांधींची मालकी नाही. महात्मा गांधींमुळे खादी उत्पादनांमध्ये आणि चलनात घसरण झाली असल्याचंही', त्यांनी म्हटलं होतं. 'जेव्हापासून महात्मा गांधी चलनावर दिसू लागले तेव्हापासून घसरणीला सुरुवात झाली. नोटेवरुनही त्यांचं छायाचित्र काढून टाकण्यात येणार आहे', असा दावा त्यांनी केला होता.
 
(मोदी यांनी घेतली गांधीजींची जागा!)
(शाळांमध्येही लावा मोदींचा फोटो, शिक्षण विभागाकडून आदेश)
 
दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावर गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी 'हे वक्तव्यच बाष्कळ आहे. पण ज्याप्रकारे राजकाराणी पैशाचा वापर चुकीच्या कामांसाठी करतात ते पाहता त्यांना हटवणं योग्य राहिल', असं म्हणत टोला हाणला आहे. तर लालूप्रसाद यादव यांनी हे देशाची नालायक मुलं असल्याचं म्हटलं आहे. 
 
या सर्व वादानंतर अनिल वीज यांनी हे माझं वैयक्तिक मत होतं, कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचं सागंत माफी मागितली. 
 

Web Title: Hitler and Mussolini were brands too, Rahul Gandhi's target on Modi