शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उदभवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
3
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
4
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
5
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
6
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
7
पुतीन परतले, पुढे...?
8
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
9
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
10
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
11
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
12
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
13
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
14
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
15
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
16
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
18
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
19
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
20
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

'इतिहास गवाह है'... कर्नाटकात जे जिंकतात, ते केंद्रात हरतात

By बाळकृष्ण परब | Updated: May 2, 2018 16:24 IST

केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाने आणि विरोधी पक्षात असलेल्या कर्नाटकची निवडणुक जिंकून पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ चालवली आहे. मात्र कर्नाटक विधानसभा निवडणुकीबाबत एक आकडेवारी पाहिली तर या दोन्ही पक्षांना कर्नाटकमध्ये जिंकणे फारसे आवडणार नाही.  

मुंबई  - कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता ऐन बहरात आला आहे. सत्ताधारी काँग्रेससह, भाजपा आणि जनता दल (सेक्युलर) या पक्षांनी कर्नाटकचे तख्त हस्तगत करण्यासाठी कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान देवेगौडा असे दिग्गज नेते प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. विशेषत: केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाने आणि विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसने कर्नाटकची निवडणुक जिंकून पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ चालवली आहे. मात्र कर्नाटक विधानसभा निवडणुकीबाबत एक आकडेवारी पाहिली तर या दोन्ही पक्षांना कर्नाटकमध्ये जिंकणे फारसे आवडणार नाही.  या आकडेवारीनुसार 1999 पासून कर्नाटक विधानसभेत सर्वात मोठा पक्ष ठरणारा पक्ष त्यानंतर होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत हमखास पराभूत होतो. असे दिसून आले आहे.आता यावर विश्वास बसत नसेल तर 1999 पासून झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीची आकडेवारी काढू पाहा. 1999 कर्नाटक विधानसभा निवडणूक -  या आकडेवारीनुसार  1999 साली झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने 132 जागा जिंकत सत्ता स्थापन केली होती. पण त्याच वर्षी झालेल्या लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुकीत काँग्रेसला पराभव पत्करावा लागला होता. तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात भाजपाने केंद्रात सत्ता स्थापन केली होती. 

 2004 कर्नाटक विधानसभा निवडणूक -  त्यानंतर 2004 साली कर्नाटकमध्ये विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्रच झाल्या. त्यावेळी त्रिशंकू विधानसभेत भारतीय जनता पक्ष 79 जागा जिंकून राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र लोकसभा निवडणुकीत पराभूत होऊन भाजपाला सत्ता गमवावी लागली. नंतर काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केल्याने राज्यातही भाजपाला सत्तेपासून वंचित राहावे लागले. मात्र काही वर्षांनी काँग्रेसचे सरकार पडल्यावर भाजपा आणि जनता दल सेक्युलरने एकत्र येत सरकार स्थापन केले. 2009 कर्नाटक विधानसभा निवडणूक - भाजपा आणि जनता दल सेक्युलर यांच्यात सरकार चालवण्यावरून झालेल्या वादानंतर 2008 साली कर्नाटकमध्ये विधानसभेची मुदतपूर्व निवडणूक लागली. त्यावेळी भारतीय जनता पक्षाने 110 जिंकत कर्नाटकमध्ये सरकार स्थापन केले होते. पण कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीनंतर वर्षभराने झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाल पुन्हा एकदा पराभूत व्हावे लागले होते.  

2013 कर्नाटक विधानसभा निवडणूक -  2013 साली झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपाचा धुव्वा उडवत 122 जागांसह दणदणीत विजय मिळवला होता. मात्र या विजयाचा आनंदही फार काळ टिकला नाही कारण 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदीलाटेसमोर काँग्रेस चारीमुंड्या चीत झाली होती. त्यामुळे यंदाच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत जिंकणारा पक्ष पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुकीही विजयी होऊन हे मिथक तोडतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnatakकर्नाटकBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण