श्रीहरिकोटा : भारताने शुक्रवारी स्टार्टअपने पूर्णपणे विकसित केलेल्या प्रक्षेपकाच्या साहाय्याने (रॉकेट) तीन खासगी उपग्रह यशस्वीरीत्या पाठविले आहेत. चेन्नईपासून ११५ किमी अंतरावर असलेल्या अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) सतीश धवन अंतराळ केंद्रातून विक्रम एस. रॉकेट सकाळी ११.३० वाजता प्रक्षेपित करण्यात आले. अंतराळ कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांना श्रद्धांजली म्हणून ‘विक्रम एस’ असे नाव देण्यात आलेले खासगी रॉकेटने आपल्या पहिल्याच प्रयत्नात यशाची चव चाखली. हे रॉकेट स्कायरूट एरोस्पेस-डिझाइन कंपनीने विकसित केले आहे.
ऐतिहासिक! देशाचे पहिले खासगी रॉकेट झेपावले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 07:48 IST