बापरे! रंगमंचावर नृत्य करणाऱ्या कलाकाराचा हार्ट अटॅकने मृत्यू, अचानक खाली कोसळला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 14:55 IST2023-09-08T14:55:26+5:302023-09-08T14:55:57+5:30

जन्माष्टमीला सुदामाची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याला अचानक हार्ट अटॅक आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

hisar sata narayan mandir artist rohit died janmashtami | बापरे! रंगमंचावर नृत्य करणाऱ्या कलाकाराचा हार्ट अटॅकने मृत्यू, अचानक खाली कोसळला अन्...

फोटो - दैनिक भास्कर

हरियाणातील हिस्सारमध्ये जन्माष्टमीला सुदामाची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याला अचानक हार्ट अटॅक आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे तो खाली पडला. लोकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले मात्र तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. मृत्यू झालेल्या अभिनेत्याचं नाव रोहित असून तो सुदामाची भूमिका साकारत होता. तो 32 वर्षांच्या असल्याची माहिती समोर आली आहे. 

हिसार शहरातील पडव चौकाजवळील श्री सत्यनारायण मंदिरात गुरुवारी मध्यरात्री जन्माष्टमीचा कार्यक्रम सुरू होता. येथे रोहित रंगमंचावर सुदामाच्या भूमिकेत होता. तो स्टेजवर नाचत होता. यादरम्यान अचानक छातीत दुखू लागले. तो स्वत:ला सावरण्याआधीच अचानक खाली पडला. हे पाहून एकच खळबळ उडाली. 

घाईघाईत त्याला दवाखान्यात नेण्यात आले. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, रोहितला आधीपासूनच हृदयविकाराचा त्रास होता. 3-4 स्टेंटही टाकण्यात आले. हार्ट अटॅकने मृत्यू झाल्यानंतर सुदामा बनलेल्या रोहितचा शेवटचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तो स्टेजवर अभिनय करताना डान्स करत आहे. यादरम्यान लोक त्याच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेताना दिसतात.

रात्री 11.30 ते 12 च्या दरम्यान ही घटना घडल्याचं शेजारी राहत असलेल्या राकेश यांनी सांगितलं. रोहित हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याला दोन मुलं आहेत. रोहित गेल्या 6 वर्षांपासून हा रोल करत होता. त्याचा अभिनय पाहून लोकांना प्रेरणा मिळायची. तो स्विगीमध्येही काम करायचा. तो खूप मनमिळावू होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: hisar sata narayan mandir artist rohit died janmashtami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.