शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

"वाद निर्माण करणे आणि सनसनाटी पसरवणे त्यांची सवय..."; केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष शंकराचार्यांवर बरसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 11:58 IST

Swami Avimukateshwaranand: "त्यांनी (शंकराचार्य) यासंदर्भात पुरावे सादर करावेत. वाद निर्माण करणे आणि सनसनाटी पसरवणे ही स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची सवय आहे," असे अजय यांनी म्हटले आहे.

उत्तराखंडमधील केदारनाथ धामसंदर्भात बोलतानना शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी मोठा दावा केला आहे. येथून 228 किलो सोने गायब झाले आहे. हा मोठा घोटाळा आहे, मात्र यावर कुणीच बोलत नाही, असे स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटले आहे. यानंतर, श्री बद्रीनाथ-केदारनाथमंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनीची प्रतिक्रिया आली आहे. "त्यांनी (शंकराचार्य) यासंदर्भात पुरावे सादर करावेत. वाद निर्माण करणे आणि सनसनाटी पसरवणे ही स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची सवय आहे," असे अजय यांनी म्हटले आहे.

'वाद निर्माण करणे, सनसनाटी पसरवणे स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची सवय' -श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितिचे अध्यक्ष अजेंद्र अजय म्हणाले, केदारनाथ धाममध्ये असे (228 किलो सोनं गायब झालं) झाल्याचे बोलणे, अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. यासंदर्भात शंकराचार्यानी पुरावे सादर करायला हवेत, अशी विनंतीही त्यानी केली. एवढेच नाही तर, "मी स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचा आदर करतो. मात्र, ते दिनभर प्रेस कॉन्फ्रन्स करत राहतात. वाद निर्माण करणे, सनसनाटी पसरवणे आणि चर्चेत राहणे, ही स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची सवय आहे."

केदारनाथच्या प्रतिष्ठेला धक्का लावण्याचा अधिकार नाही - एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, मंदिर समितीचे अध्यक्ष म्हणाले, "केदारनाथ धाममधील सोने गायब झाल्यासंदर्भातील स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचे विधान अत्यंत दुर्दैवी आहे. मी त्यांना विनंती करतो आणि आव्हानही करतो की त्यांनी तथ्य आणि पुरावे समोर आणावेत. त्यानी अधिकाऱ्यांकडे जायला हवे, पुरावे सादर करायला हवेत. अन्यथा अनावश्यक वाद निर्माण करून केदारनाथच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याचा त्याना कसलाही अदिकार नाही."

काय म्हणाले होते शंकराचार्य? -शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले होते, केदारनाथमध्ये सोन्याचा घोटाळा झाला आहे. तो मुद्दा का उपस्थित केला गेला नाही. तिथे घोटाळा केल्यानंतर आता दिल्लीमध्ये केदारनाथ मंदिर बांधलं जाईल, तिथे पुन्हा एकदा घोटाळा होईल. 

गेल्या वर्षी केदरनाथ मंदिरातील एका वरिष्ठ पुजाऱ्याने केदारनाथ मंदिरामध्ये सोनाच्याचा मुलामा लावण्याच्या कामामध्ये १२५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. तसेच या कामात सोन्याऐवजी पितळाचा मुलामा दिल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र मंदिर समितीने हा आरोप फेटाळून लावला होता. यासंदर्भात शंकराचार्य म्हणाले, केदारनाथमधील २२८ किलो सोनं गायब आहे. कुठलाही तपास झालेला नाही. त्यासाठी कोण जबाबदार आहे? आता ते म्हणताहेत की दिल्लीमध्ये केदारनाथ मंदिर बनवणार आहोत. हे होणार नाही.

टॅग्स :KedarnathकेदारनाथTempleमंदिरGoldसोनं