शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
4
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
5
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
6
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
7
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
8
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
9
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
10
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
11
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
12
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
13
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
14
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
15
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
16
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
17
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
18
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
19
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
20
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

‘राजपथ’ला ‘कृषिपथ’ करण्याचा इशारा, सरकारला सद्‌बुद्धी येण्यासाठी केली प्रार्थना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 06:58 IST

Farmers Protest : कितीही कडाक्याची थंडी पडली तरीही कायदे मागे घेईपर्यंत जागचे हटायचे नाही असा संकल्प शेतकऱ्यांनी केला आहे.

-  विकास झाडे

नवी दिल्ली : केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे परत घेतले नाहीत, तर येत्या गणतंत्र दिवशी राजपथचे नाव बदलून कृषिपथ करण्यात येईल, असा इशारा शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी दिला आहे, तर सरकारला सद्‌बुद्धी येवो म्हणून शेतकऱ्यांनी सामूहिक प्रार्थना केली.आंदोलनाच्या २४ व्या दिवशीही शेतकऱ्यांनी वेगवेगळे महामार्ग जाम केले आहेत. आता आमची परीक्षा घेऊ नका, असा इशारा देत मोदी सरकारला सद्‌बुद्धी येवो यासाठी गौतमबुद्धनगर येथे दलित प्रेरणा स्थळावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सामूहिक प्रार्थना केली. भारतीय किसान युनियनतर्फे याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी किन्नर समुदायाने आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन दिले व कृषी कायद्याविरोधात गाणे म्हणत त्यांनी नृत्यही केले.कितीही कडाक्याची थंडी पडली तरीही कायदे मागे घेईपर्यंत जागचे हटायचे नाही असा संकल्प शेतकऱ्यांनी केला आहे. दिल्लीच्या विविध सीमांवर शेतकऱ्यांची गर्दी आणि जिद्द दिसून येते. अन्य राज्यांतून दिल्लीत येणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून वाहतूक विभागाने काही रस्ते वळविले आहेत. ‘खाप’चे चौधरी सुरेंद्र सिंह यांनी राष्ट्रीय महामार्ग जाम करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले. त्यानुसार सहारनपूर महामार्ग जाम करण्यातआला. खापतर्फे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. अन्य जिल्ह्यांतील खाप पंचायतचा पाठिंबा मिळाला आहे. यात मुस्लिम खाप पंचायतचाही समावेश आहे. तेलंगणाची अभिनेत्री लक्ष्मी पार्वती हिने चिल्ला सीमेवर जाऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. फतेहबाद येथे भाजपच्या नेत्यांनी उपवास ठेवले होते. शेतकऱ्यांनी पोलिसांचे बॅरिकेडस्‌ तोडत उपवास स्थळ गाठले आणि तेथील भाजपचे पोस्टर्सफाडले. सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. बसपाच्या प्रमुख मायावती यांनी सरकारने तिन्ही कायदे परत घ्यावेत व शेतकऱ्यांसोबत सहानुभूतीपूर्वक वागणूक ठेवावी, असे ट्वीट केले.

श्रद्धांजलीशेतकरी आंदोलनात आतापर्यंत विविध कारणांनी २९ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यात सिंघू, टिकरी सीमेशिवाय हरियाणा आणि पंजाबमधील शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्या सगळ्यांना श्रद्धांजली देण्यासाठी सिंघू सीमेवर शनिवारी सकाळी ९ ते ११ पर्यंत पूजा करण्यात आली. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपdelhiदिल्ली