हिंगोलीत मुलीनेच केला आईचा खून

By Admin | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:09+5:302015-08-02T22:55:09+5:30

आरोपीस अटक : घरगुती कारणावरून दोरीने गळा आवळला

Hingoli daughter murdered mother | हिंगोलीत मुलीनेच केला आईचा खून

हिंगोलीत मुलीनेच केला आईचा खून

ोपीस अटक : घरगुती कारणावरून दोरीने गळा आवळला
हिंगोली : शहरातील कमलानगर भागात मुलीनेच ६५ वर्षीय आईचा दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे.
मयत महिलेचे नाव लिलाबाई किसन भिसे(६५) असे आहे. तिचा मुलगा शिवाजी याने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रेखा गजानन झुळझुळे (२५ रा.कमलानगर) हिच्याविरूद्ध गुन्हा झाला आहे. रेखा काही वर्षरपूर्वी विवाह झाला. मात्र पती नांदवत नसल्याने ती आईकडेच राहाते. रेखाची ८ वर्षांची मुलगी मतीमंद असून तिला शाळेत टाकण्यावरून तसेच घरगुती कारणावरून मायलेकीमध्ये काही दिवसांपासून वाद होता. त्याच कारणावरून रविवारी सकाळी त्यांचे भांडण झाले. यात रेखाने दोरीने गळा आवळून आईला ठार मारले. (प्रतिनिधी)
चौकट
परभणीत खून
पाकीटमार साथीदाराच्या डोक्यात अवजड वस्तूने प्रहार करून त्याचा खून केल्याची घटना शनिवारी पाथरी शहरात घडली़ पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. शहरातील मुजाहिद मुखीद कुरेशी आणि किशन विश्वनाथ रोडे हे जीवलग मित्र गेल्या काही वर्षांपासून चोरी करायचे़ काही दिवसांपासून त्यांच्यात वाद झाला होता. या भांडणातूनच ३१ जुलै रोजी मुजाहेद याने किशनच्या डोक्यात अवजड वस्तू मारून त्याला गंभीर जखमी केले़ उपचारादरम्यान शनिवारी रात्री त्याचा मृत्यू झाला़ (वार्ताहर)

Web Title: Hingoli daughter murdered mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.