शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
3
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
4
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
5
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
6
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
7
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
8
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
9
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
10
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
11
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
12
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
13
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
14
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
15
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
16
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
17
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
18
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
19
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
20
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

हिंदुत्व, मोदी अन् विकास, भाजपची सुरतसाठी त्रिसुत्री; सूरतवासी कोणता कोहिनूर निवडणार?

By शांतीलाल गायकवाड | Updated: November 24, 2022 10:28 IST

सूरत अर्थात टेक्सटाईल आणि डायमंड सिटीच राहिली नसून ते आता उड्डाणपुलाचे शहरही झाले आहे.

सूरत : सात दिवसांवर मतदान आलेल्या दक्षिण गुजरातमधील सूरत शहरात आता प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. भाजपा विकास, हिंदुत्व आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुढे करून मतदारांना आकर्षित करीत आहे. तर आम आदमी पार्टी दिल्लीच्या शाळा, मोफत वीज आणि महिलांना सन्मान वेतन देण्याची स्वप्न विकते आहे. काँग्रेस मात्र अद्यापही आपल्या जुन्याच शस्त्रांसह लढते आहे.

सूरत अर्थात टेक्सटाईल आणि डायमंड सिटीच राहिली नसून ते आता उड्डाणपुलाचे शहरही झाले आहे. ४८ लाख लोकसंख्येच्या या  शहरात तब्बल १२ लाख लोक टेक्स्टाईल उद्योगात आहेत. जवळपास २०० कापड कंपन्या आहेत. ७० हजाराहून अधिक कपड्यांची, शोरुम, दुकाने शहरात आहेत. तेवढाच मोठा उद्योग हिरे व जड जवाहरतीचा आहे. 

गेल्या २७ वर्षापासून हे शहर भाजपने एक हाती ताब्यात ठेवले आहे. गेल्या निवडणुकीत १६ पैकी १५ जागा भाजपने जिंकल्या होत्या. पंतप्रधान मोदी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आतापर्यंत पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते पहिल्या टप्प्यातील   मतदारसंघात येऊन गेले आहेत. काँग्रेस मात्र यंदा आपमुळे काहीसा धोक्यात आल्याचे दिसतो. 

सूरत महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आपने भाजपाला टक्कर देत २७ जागा हस्तगत केल्या व सभागृहात विरोधी  पक्षाची जागा पटकावली. तेथूनच आपच्या राजकीय इच्छा जागृत झालेल्या आहेत.

सूरतमध्ये पावला पावलावर महाराष्ट्र...- सूरतमध्ये सूरती, गुजराती, हिंदी व मराठी भाषा बोलली जाते येथे पाऊला पाऊलावर महाराष्ट्र माणूस भेटतो. विशेषत: उत्तर महाराष्ट्रातून धुळे, जळगाव आदी भागातून मोठ्या संख्येने महाराष्ट्र माणूस येथे रोजगाराच्या शोधात आला आहे. - रिक्षाचालक नानाभाई धोंडखेडे हे गेल्या २५ वर्षापासून येथे रिक्षा चालवतात. ते म्हणतात, यावेळेस आपची हवा आहे, पण येईल भाजपच. - सरदार पटेल भाजी मार्केटमध्ये भेटलेला दीपक गोबा पाटील  हा तरुण चोपडा तालुक्यातून गेल्या २० वर्षांपूर्वी सूरतला आला. त्यालाही मतदारसंघात आपचा प्रभाव जाणवतोय. - या दोघांनीही काँग्रेसला यंदा काहीच मिळणार नाही असे भाकीत वर्तवले. 

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022GujaratगुजरातBJPभाजपाHindutvaहिंदुत्व