पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 10:05 IST2025-04-26T10:03:31+5:302025-04-26T10:05:44+5:30

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तपास वेगाने सुरू आहे आणि यादरम्यान तपास पथकाने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

Hindus targeted in Pahalgam attack pants of dead open terrorists killed hindus seeing khatna revelation investigation team pahalgam attack | पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा

पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा

जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. आता या हल्ल्याचा तपास वेगाने सुरू आहे, सुरुवातीच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. मृतांचे कपडे पाहिल्यानंतर लष्कर, जम्मू-काश्मीर पोलिस आणि प्रशासनाच्या संयुक्त तपास पथकाने धक्कादायक विधान केले आहेत. मृतांपैकी २० जणांचे पॅन्ट काढलेल्या होत्या.

पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर

'खतना'पाहून हत्या

तपासादरम्यान, दहशतवाद्यांनी आधी पर्यटकांना त्यांच्या धर्माची चौकशी केली नंतर त्यांना गोळ्या घालून ठार मारले. दहशतवाद्यांनी पीडितांकडून आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्ससारखे ओळखपत्र मागितले. यानंतर पर्यटकांना 'कलमा' म्हणण्यास सांगितले आणि नंतर त्यांची पँट काढून 'खतना' तपासला.

दहशतवाद्यांनी ते हिंदू आहेत की नाही हे क्रूरपणे पाहिले आणि नंतर त्यांना जवळून गोळ्या घालून ठार मारले, काहींच्या डोक्यात तर काहींच्या छातीत गोळ्या झाडल्या. 

२६ मृतांपैकी २५ जण हिंदू पुरुष 

या हल्ल्यानंतर लगेच मदत मोहिम राबविण्यात आली. यावेळी सुरक्षा दलांनी मृतदेह आहे त्या अवस्थेत ताब्यात घेतले. दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला, त्यापैकी २५ हिंदू पुरुष होते.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास आता सुरू आहे. संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर भारत सरकारनेही पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई केली आहे.

पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने सीमेवर गस्त वाढवली आहे. भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानने अधिक सैन्याची जमवाजमव करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी सैनिकांनी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत नियंत्रण रेषेवर गोळीबार केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २५-२६ एप्रिल २०२५ च्या रात्री, काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराच्या विविध चौक्यांवर विनाकारण गोळीबार करण्यात आला. भारतीय जवानांनीही याला प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

Web Title: Hindus targeted in Pahalgam attack pants of dead open terrorists killed hindus seeing khatna revelation investigation team pahalgam attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.