शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

'राम मंदिर प्रकरणाचा निकाल विरोधात गेल्यास गेल्यास हिंदू आंदोलनं करतील'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2018 10:27 IST

विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष विष्णू कोकजे यांचं विधान

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यास देशभरात आंदोलनं होतील, असं विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष विष्णू कोकजे यांनी म्हटलं आहे. न्यायालयानं भावना दुखावणारा निकाल दिल्यास, अयोध्येत राम मंदिराची उभारणी करण्याचा कायदा संमत करण्यासाठी देशभरातील हिंदू आंदोलनं करुन त्यांच्या खासदारांवर दबाव आणतील, असंही त्यांनी म्हटलंय. विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर प्रथमच कोकजे यांनी हरिद्वारला भेट दिली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सर्वोच्च न्यायालयात असलेला राम जन्मभूमी प्रकरणाचा खटला लवकरच निकाली निघेल, अशी अपेक्षा कोकजे यांनी व्यक्त केली. 'सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कोट्यवधी हिंदूंच्या अपेक्षेप्रमाणे लागेल, असा विश्वास विश्व हिंदू परिषदेच्या कायदेतज्ज्ञांना वाटतो,' असंही कोकजे यांनी म्हटलं. न्यायालयाचा निकाल श्रद्धेच्या विरोधात गेल्यास देशभरातील हिंदू आंदोलनं सुरू करतील आणि आपापल्या खासदारांवर दबाव आणून त्यांना अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी कायदा संमत करायला लावतील, असं कोकजे यांनी म्हटलं. कोकजे यांच्या या विधानामुळे वाद होण्याची शक्यता आहे. सामाजिक शांतता, गोहत्येविरोधातील जनजागृती, राम मंदिराची उभारणी, नद्यांचं संरक्षण आणि संवर्धन यासाठी विश्व हिंदू परिषद यापुढेही काम करत राहील, असं कोकजे यांनी सांगितलं. विश्व हिंदू परिषदेला संकुचित म्हणणारे आता मंदिरात जाऊन पूजा करत आहेत, असं म्हणत त्यांनी राहुल गांधींवर अप्रत्यक्ष टीका केली. आम्ही कित्येक वर्षांपासून करत असलेल्या कामाचा हा परिणाम असल्याचा दावाही त्यांनी केला. मोदी सरकारनं गेल्या चार वर्षात राम मंदिराच्या उभारणीसाठी कायदा का मंजूर केला नाही, असा प्रश्न कोकजे यांना पत्रकारांनी विचारला. मात्र त्यांनी यावर थेट भाष्य करणं टाळलं. सर्व गोष्टी सरकार करु शकत नाही, असं कोकजे यांनी म्हटलं.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरSupreme Courtसर्वोच्च न्यायालयNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा