हिंदुजा समूहाने घेतली लंडनमधील ऐतिहासिक इमारत
By Admin | Updated: December 14, 2014 01:41 IST2014-12-14T01:41:33+5:302014-12-14T01:41:33+5:30
हिंदुजा समूहाने 11क्क् खोल्यांची सेंट्रल लंडनमधील ‘ओल्ड वॉर ऑफिस’ ही ऐतिहासिक इमारत 25क् वर्षाच्या भाडेपट्टय़ाने घेतली आहे.

हिंदुजा समूहाने घेतली लंडनमधील ऐतिहासिक इमारत
अडीचशे वर्षाचा भाडेपट्टा : सौद्याची रक्कम गुलदस्त्यात, पंचतारांकित हॉटेल बनविणार
लंडन : हिंदुजा समूहाने 11क्क् खोल्यांची सेंट्रल लंडनमधील ‘ओल्ड वॉर ऑफिस’ ही ऐतिहासिक इमारत 25क् वर्षाच्या भाडेपट्टय़ाने घेतली आहे. ही वास्तु हिंदुजा समूहाला देण्यात आली असल्याचे सांगून ब्रिटिश संरक्षण मंत्रलयाने या व्यवहाराला दुजोरा दिला.
या सौद्याची रक्कम समजू शकली नाही. मात्र, हे वारसास्थळ पंचतारांकित हॉटेलमध्ये आणि रहिवासी अपार्टमेंटमध्ये रुपांतरित करण्याची योजना असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत असलेल्या हिंदुजा बंधुंनी ओब्रास्कॉन हुआर्ते देसारोलोस या स्पॅनीश कंपनीसोबत मिळून ही इमारत भाडेपट्टय़ावर घेतली आहे.
ब्रिटनच्या संरक्षण मंत्रलयाने या व्यवहाराला दुजोरा देताना हिंदुजा समूहाने स्पॅनीश कंपनीसह स्पर्धात्मक बोलीद्वारे युद्धकालीन कार्यालय असलेली ही इमारत हस्तगत केल्याचे म्हटले आहे. हिंदुजा समूहाचे अध्यक्ष एस. पी. हिंदुजा, सह-अध्यक्ष जी पी हिंदुजा यांनी कंपनीच्या वतीने सांगितले की, या राष्ट्रीय स्मारकाचे यथोचित जतन आणि वारसास्थळ म्हणूनचा त्याचा लौकिक अबाधित राखण्याचा आम्ही कसोशिने प्रयत्न करू. या स्थळाचा दर्जा उंचावून आम्ही ते पुन्हा जनतेशी जोडू, असेही ते म्हणाले. जुन्या युद्ध कार्यालयाच्या नव्या अध्यायात आम्ही बजावत असलेल्या महत्त्वपूर्ण भुमिकेचा आम्हाला अभिमान आहे. (वृत्तसंस्था)
4ही ऐतिहासिक इमारत ब्रिटिश संसद आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ असून सात मजले मिळून तिचे एकूण क्षेत्र पाच लाख 8क् हजार स्क्वेअर फूट आहे.
4युद्धकाळातील तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल या इमारतीत राहात होते व त्यांनी दुस:या महायुद्धातील अनेक डावपेच याच इमारतीत आखले होते.