शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

हिंदू वारसाहक्क कायदा सगळ्या महिलांना लागू- सुप्रीम कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2018 8:15 AM

हिंदू वारसा हक्क कायदा सर्व महिलांना लागू होतो

नवी दिल्ली- केंद्र सरकारने वर्ष 2005मध्ये हिंदू वारसाहक्क कायद्यात संशोधन करत वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये मुलींना बरोबरचा हक्क देण्याची व्यवस्था केली होती. हिंदू वारसा हक्क कायदा सर्व महिलांना लागू होतो. 2005च्या आधी जन्म झालेल्या मुलींनाही हा कायदा लागू असेल, असं सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी दिलेल्या निर्णयात स्पष्ट केलं आहे. 

न्यायमूर्ती एके सिकरी आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्यासमोर या मुद्द्यावर सुनावणी झाली. मुलगीसुद्धा जन्मापासून संपत्तीमध्ये भागीदार असेल. मुलाला ज्याप्रमाणे अधिकार व उत्तरदायित्व असतं तसंच मुलीलाही लागू असेल. मुलीचा जन्म 2005 च्याआधी झाला होता असं म्हणून वडिलोपार्जित संपत्तीमध्ये तिला हक्क देणं नाकारता येणार नाही, असं कोर्टाने म्हंटलं.  

सुप्रीम कोर्टाने म्हंटलं की, हिंदू वारसाहक्क कायदा वर्ष 2005च्याआधी दाखल आणि कायदा तयार केल्यानंतर प्रलंबित मालमत्तेशी निगडीत सगळ्या प्रकरणांवर लागू होतो. संपत्तीशी निगडीत प्रकरणांमध्ये मुलगा व मुलींना बरोबरचा अधिकार देण्यासाठी कायद्यात बदल केला गेला होता. वडिलांच्या संपत्तीमध्ये वाटा मागणाऱ्या दोन बहिणींच्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने हा निकाल दिला आहे. या दोन बहिणींच्या भावांनी त्यांना संपत्तीमधून वाटा देण्यासाठी नकार दिला होता. त्यानंतर त्यांनी 2002 साली कोर्टात धाव घेतली. ट्रायल कोर्टाने 2007मध्ये त्यांची याचिका खारिज केली होती. 2005 च्या आधी त्या दोन बहिणींचा जन्म झाला म्हणून संपत्तीवर त्यांचा अधिकार नाही, असं म्हणत याचिका खारिज करण्यात आली होती. हायकोर्टानेही त्यांची याचिका फेटाळली होती. ट्रायल कोर्ट व हायकोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर त्या दोघींनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. या दोन बहिणींच्या याचिकेवर सहमती दाखवत सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय बदलला.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय