शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

हिंदू महासभेकडून देशातील पहिल्या हिंदू न्यायालयाची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 6:50 PM

शरियतच्या धर्तीवर हिंदू महासभेकडून न्यायालय स्थापन

मेरठ: हिंदू महासभेनं देशातील पहिल्या हिंदून्यायालयाची स्थापना केली आहे. शरियतच्या धर्तीवर या न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे. या न्यायालयात हिंदूंशी संबंधित खटल्यांवर निकाल देण्यात येतील, असं हिंदू महासभेकडून जाहीर करण्यात आलं आहे. हे न्यायालय दारुल काझाच्या (शरियत न्यायालय) बरोबरीचं असेल, असंही हिंदू महासभेकडून सांगण्यात आलं आहे. दारुल काझाकडून इस्लाम कायद्यानुसार विविध प्रकरणांवर निर्णय दिले जातात. त्याच धर्तीवर हिंदू महासभेनं हिंदू न्यायालयाची स्थापना केली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं हिंदू महासभेनं या न्यायालयाची स्थापना केली असून या न्यायालयात हिंदू महिलांनावर होणारे अत्याचार, हिंदूंचे विवाह, संपत्ती आणि पैशांचे वाद यावर निकाल देण्यात येणार आहेत. आजपासून या न्यायालयाच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. मेरठच्या शारदा रोडजवळ हे न्यायालय आहे. आम्ही काही दिवसांपूर्वी शरियत न्यायालयांना आव्हान दिलं होतं. त्यासाठी आम्ही मोदी सरकारला पत्रदेखील लिहिलं होतं, असं हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पंडित अशोक शर्मा यांनी सांगितलं. 'देशातील सर्व नागरिकांसाठी एकच कायदा असावा, अशी आमची मागणी आहे. यासाठी आम्ही सरकारला पत्र दिलं होतं. आमची मागणी मान्य न झाल्यास आम्हीदेखील हिंदूंसाठी वेगळं न्यायालय सुरू करु, असा इशारा आमच्याकडून देण्यात आला होता. मात्र सरकारनं कोणतीही हालचाल केली नाही. त्यामुळे आम्ही हिंदूंसाठी पहिलं न्यायालय सुरू केलं आहे,' असं वर्मा म्हणाले. अखिल भारतीय हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सचिव पूजा शकुन पांडे यांची हिंदू न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्या हिंदू न्यायालयाच्या पहिल्या न्यायाधीश आहेत. आम्ही या न्यायालयात हिंदूंचे विवाह, हिंदूंमधील संपत्तींचे वाद यांच्यासह अनेक प्रकरणांवर निकाल देऊ, असं पांडे यांनी सांगितलं. 'भाजपा सत्तेत आल्यामुळे आम्हाला मोठी आशा होती. मात्र आता भाजपानं हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं राजकारण सुरू केलं आहे. त्यामुळे आम्ही हिंदू न्यायालयाच्या माध्यमातून हिंदूंना एकत्र आणत आहोत,' असं पांडे म्हणाल्या.  

टॅग्स :HinduहिंदूCourtन्यायालयMuslimमुस्लीमNarendra Modiनरेंद्र मोदी