शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

हिंदूंचा वर्षानुवर्षे अपमान झाला, मोदी सरकारमध्ये सन्मान मिळाला - अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 19:18 IST

Amit Shah : पाटीदार समाजाचे कौतुक करत गुजरात आणि देशाच्या उन्नतीचा इतिहास या समाजाशी निगडित असल्याचे अमित शाह यांनी सांगितले.

अहमदाबाद : हिंदू समाजाच्या श्रद्धा केंद्रांचा अनेक वर्षांपासून अपमान करण्यात आला आणि 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर येईपर्यंत कोणीही नाही, त्यांचा सन्मान करण्याची तसदी घेतली नाही. मोदी सरकार आता अशा स्थळांच्या नूतनीकरणासाठी 'निर्भयपणे' काम करत आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी शनिवारी सांगितले. तसेच, ते म्हणाले की, पूर्वी लोक मंदिरात जाण्यास टाळाटाळ करत होते, परंतु मोदी सरकारमुळे एक नवीन युग सुरू झाले आहे.

अहमदाबादमधील कडवा पाटीदार समाजाची देवी 'माँ उमिया' समर्पित उमियाधाम मंदिराच्या पायाभरणी समारंभात अमित शाह बोलत होते. जवळपास 1500 कोटी रुपयांचा खर्च करून हे मंदिर आणि इतर इमारती बांधल्या जात आहेत. या कार्यक्रमात संबोधित करताना ते म्हणाले, "अनेक वर्षांपासून हिंदू समाजाच्या श्रद्धा केंद्रांचा अपमान करण्यात आला आणि केंद्रात मोदी सरकार पूर्ण बहुमताने सत्तेवर येईपर्यंत कोणीही त्यांचा सन्मान करण्यासाठी पुढाकार घेतला नाही."

याचबरोबर अमित शाह म्हणाले, आज आर्य समाजी (गुजरातचे राज्यपाल) आचार्य देवव्रत यांच्या हस्ते एका भव्य मंदिराची पायाभरणी होत असताना, अशा प्रसंगी मी सांगू इच्छितो की मोदीजींनी आपल्या केंद्रांच्या जीर्णोद्धारासाठी विश्वास, निर्भयपणे, आत्मविश्वासाने आणि आदराने काम केले. ते म्हणाले की, पंतप्रधानांनी आदि शंकराचार्यांच्या प्रतिमेचे अनावरण केले आणि 2013 च्या महापुराने उद्ध्वस्त झालेल्या केदारनाथ मंदिर परिसरात कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धा केंद्राचे पुनरुज्जीवन केले.

'काशीमध्ये पीएम मोदी मंदिराचा जीर्णोद्धार करणार' 'औरंगजेबाच्या काळात उद्ध्वस्त झालेल्या काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार आपण 13 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होताना पाहू. मंदिरे ही केवळ धार्मिक श्रद्धेची केंद्रेच नाहीत, तर ती समाजसेवेची आणि जीवनातून निराश झालेल्या लोकांसाठी त्यांच्या अडचणींवर मात करून पुढे जाण्यासाठी ऊर्जा देणारी केंद्रे आहेत, असे अमित शाह म्हणाले. तसेच, पाटीदार समाजाचे कौतुक करत गुजरात आणि देशाच्या उन्नतीचा इतिहास या समाजाशी निगडित असल्याचे त्यांनी सांगितले.

पीएम मोदीही सहभागी होणारतीन दिवसीय पायाभरणी समारंभाच्या पहिल्या दिवशी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल, राज्यपाल आचार्य देवव्रत आणि इतरांनी कार्यक्रमात भाग घेतला. तसेच, 13 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी व्हर्च्युअल माध्यमातून पायाभरणी समारंभाला उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :Amit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरात