शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Hindenburg Research : 'हिंडेनबर्गचा नवा अहवाल देशाविरुद्धचे षड्यंत्र', इंडिया आघाडीला शेअर..." भाजपा नेत्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 14:17 IST

Hindenburg Research : काल हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहासह सेबीच्या अधिकाऱ्यांवर मोठा आरोप केला. यामुळे शेअर मार्केटमध्ये गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले.

Hindenburg Research : हिंडेनबर्ग रिसर्चने मागील वर्षी अदानी समुहाविरोधात आरोप केले होते. या आरोपानंतर शेअर मार्केटमध्ये गोंधळ सुरू झाल्याचे पाहायला मिळाले होते. आता पुन्हा एकदा हिंडेनबर्ग रिसर्चने आरोप केले आहेत. आता त्यांनी सेबी प्रमुख माधबी पुरी बुच आणि अदानी समूहाविरुद्धच्या नवीन अहवालावरून गदारोळ सुरू आहे. मात्र, सेबी प्रमुखांनी यावर स्पष्टीकरण देत ते निराधार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, आता भाजपने हिंडेनबर्ग रिसर्च आणि इंडिया आघाडीवरही हल्लाबोल केला आहे. 

राज ठाकरेंनी दोन-तीनदा माझं नाव घेतलं, पण...; आरक्षणाबाबतच्या गंभीर आरोपांना शरद पवारांचं प्रत्युत्तर

या अहवालावरुन आता भाजपाने हिंडेनबर्ग रिसर्चला धारेवर धरले आहे. भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी आज पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी विरोधकांवरही आरोप केले. 'हे सर्व देशाविरुद्धचे षड्यंत्र आहे.  तिसऱ्यांदा पराभव झाल्यानंतर काँग्रेस पक्ष, इंडिया आघाडीचे लोक आणि त्यांना प्रोत्साहन देणारे टूल किटचे लोक भारताला आर्थिकदृष्ट्या अस्थिर करण्याचा कट रचत आहेत, असा आरोप त्यांनी केला. 

भाजपा नेते रविशंकर म्हणाले की, सोमवारी शेअर मार्केटमध्ये अस्थिरता निर्माण होण्यासाठी हिंडेनबर्ग अहवाल शनिवारी प्रसिद्ध केला जातो. रविवारी त्या अहवालावर गोंधळ निर्माण केला जातो.

सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारीतील तपास पूर्ण केल्यानंतर सेबीने जुलैमध्ये हिंडेनबर्गविरुद्ध नोटीस जारी केली होती. आपल्या बचावात उत्तर देण्याऐवजी हिंडेनबर्ग यांनी हा अहवाल सादर केला असून तो पूर्णपणे निराधार आहे, असंही भाजपा नेते म्हणाले. 

 Hindenburgचा पलटवार

हिंडेनबर्गनं सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर माधबी पुरी आणि सेबीनंही त्यावर प्रतिक्रिया देत हे आरोप हे आरोप निराधार आणि चारित्र्यहनन करणारे असल्याचं म्हटलं होतं. तर दुसरीकडे अदानी समूहानंही हे आरोप फेटाळून लावले होते. परंतु यानंतर हिंडेनबर्गनं पुन्हा एकदा माधबी पुरी बुच यांच्यावर निशाणा साधलाय. 'आमच्या ताज्या अहवालात केलेले आरोप सेबी प्रमुखांनी काही प्रमाणात मान्य केले आहेत,' असा दावा त्यांनी केलाय.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हिंडेनबर्गनं हा दावा करत पुन्हा एकदा निशाणा साधला. सेबी प्रमुखांची गुंतवणूक अदानींशी संबंधित कंपन्यांमध्ये असल्यानं सेबीनं अदानी समूहाच्या रिपोर्टवर कारवाई करण्याचा करण्याची इच्छा व्यक्त केली नाही, असं या अहवालात म्हटलं आहे.

टॅग्स :BJPभाजपा