शहरं
Join us  
Trending Stories
1
चमत्कार...! ISRO चं मिशन फेल झालं, पण १६ पैकी एक सॅटेलाईट जिवंत वाचला! अवकाशातून पाठवला सिग्नल
2
ट्रम्प प्रशासनासोबत भारताची महत्त्वाची चर्चा; ५०% टॅरिफचा फास सैल होणार?
3
लग्नानंतर २० दिवसांतच नात्याला काळिमा! दिराचाच नववधूवर वाईट डोळा, सासूनेही दिली साथ; पती तर म्हणाला..
4
झाले आता TVS iCube ही पेटली! ते पण आपल्या कोल्हापुरात; एकटी ओला उगाच बदनाम झाली...
5
WPL 2026: अरे देवा!! इतिहासात पहिल्यांदाच घडले; डेब्यू मॅचमध्येच आयुषी सोनी 'रिटायर्ड आऊट'
6
TATA च्या 'या' कंपनीत पुन्हा मोठा 'सायलेंट कट'; Q3 मध्ये ११ हजार जणांची कपात, दोन तिमाहीत ३० हजार जणांची गेली नोकरी
7
आजचे राशीभविष्य, १४ जानेवारी २०२६: मकर संक्रांत, एकादशीचा दिवस कसा असेल? तुमची रास कोणती?
8
इस्त्रायलचा मोठा धमाका! संयुक्त राष्ट्रांच्या ७ संस्थांसोबतचे संबंध तोडले; पक्षपाताचा आरोप करत घेतला टोकाचा निर्णय
9
२०२६चे पहिले सूर्य गोचर: १ उपाय, १ महिना लाभ; सरकारी कामात यश-लाभ, पैसा येईल, पण उधारी टाळा!
10
आता झेडपीची रणधुमाळी; १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान, तर सातला निकाल
11
कुलाबा प्रकरणात अधिकाऱ्याची चूक दिसत नाही; निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्पष्टीकरण
12
भटका कुत्रा चावला तर जबर भरपाई द्यावी लागेल; न्यायालयाचा श्वानप्रेमी आणि राज्यांना कडक इशारा
13
मतदानाला मास्क घालूनच बाहेर पडा; मुंबईत विविध ठिकाणच्या प्रकल्पांमुळे हवेचा दर्जा घसरला
14
भारतावर पुन्हा एकदा २५% टॅरिफ? इराणशी व्यापार करणे पडणार महागात; ट्रम्प आणखी आक्रमक
15
काय सांगता ! पुणे शहरातील वाहतूक अधिक शिस्तबद्ध, चालक गाडी चालवतात शांतपणे
16
शेतकऱ्याला अधिकाऱ्याने चक्क बुटाने केली मारहाण; अनुदानाबाबत विचारल्याने आला राग
17
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
18
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
19
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
20
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या केंब्रिजमधील भाषणाची हिमंता बिस्वा सरमांकडून चिरफाड, प्रत्येक आरोपाला दिलं उत्तर, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 10:48 IST

Himanta Biswa Sarma Vs Rahul Gandhi: भाजपाचे फायरब्रँड नेते, आसामचे मुख्यमंत्री आणि राहुल गांधींचे कडवे विरोधत हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींच्या केंब्रिजमधील भाषणावर जोरदार पलटवार केला आहे.

लंडनमधील केंब्रिज विद्यापीठामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणावरून आता वादाला तोंड फुटले आहे. त्यातच आता भाजपाचे फायरब्रँड नेते, आसामचे मुख्यमंत्री आणि राहुल गांधींचे कडवे विरोधत हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींच्या केंब्रिजमधील भाषणावर जोरदार पलटवार केला आहे. हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींच्या प्रत्येक आरोपाला घणाघाती भाषेत प्रत्युत्तर दिलं आहे.  आधी परकीय एजंट आम्हाला लक्ष्य करायचे, आता आमचेच लोक परदेशात जाऊन आम्हाला लक्ष्य करत आहेत, केंब्रिजमध्ये जाऊन राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेवर शिंतोडे उडवण्याचं काम केलं आहे, असा टोला हिमंता बिस्वा सरमा यांनी लगावला आहे. हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विट करून लिहिलं की, राहुल गांधी म्हणालेत लोकशाही धोक्यात आहे. त्यामुळे ते आपलं म्हणणं उघडपणे मांडू शकत नाहीत.  मात्र वास्तव हे आहे की, त्यांनी ४ हजार किमी यात्रा केली. मात्र यादरम्यान, त्यांच्यासोबत कुठेही कुठल्याही प्रकारची दुर्घटना झालेली नाही. मोदी सरकारने पुरवलेल्या सुरक्षेमुळे हे शक्य झाले. मात्र काँग्रेसच्या सत्ताकाळात भाजपा नेत्यांच्या यात्रेमध्ये काय व्हायचे याची आठवण राहुल गांधींना करून दिली पाहिजे.

यावेळी पेगाससवर बोलणाऱ्या राहुल गांधींवरही हिमंता बिस्वा सरमा यांनी निशाणा साधला. राहुल गांधी म्हणतात की, त्यांच्या फोनमध्ये पेगासस सॉफ्टवेअर होता. याबाबत त्यांना एका अधिकाऱ्याने इशारा दिला होता. मग त्यांनी त्यांचा फोन सुप्रीम कोर्टाने तपासासाठी मागितल्यावर जमा का केला नाही. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने पेगासस असल्याचे कुठलेही पुरावे नसल्याचा निकाल दिला होता.

दरम्यान, राहुल गांधींनी केलेल्या चीनच्या कौतुकावरूनही हिमंता बिस्वा सरमा यांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, बीआरआय आज जगातील अनेक देशांमधील कर्जासाठी कारणीभूत आहे. अंकल पित्रोदा यांनी याबाबत सांगितलं नाही? राहुल गांधी यांनी लोकशाहीमध्ये मॅन्युफॅक्चरिंगबाबत प्रश्न उपस्थित केले. मात्र त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांनी लोकशाहीच सस्पेंड करून ठेवली होती. तेव्हा खरोखरच मॅन्युफॅक्चरिंग वाढली नव्हती. मात्र आज नरेंद्र मोदींनी पीएलआय स्किम सुरू केली आहे. त्यामुळे ती वाढली आहे, असेही सरमा यांनी सांगितले.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा