शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

Himachal Elections:'काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार, घराणेशाही, विकासकामांमध्ये अडथळा', PM मोदींनी तोफ डागली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 15:25 IST

Himachal Pradesh Assembly Elections: 'आमच्या विकास कामांमुळे अनेक राज्यातील जनतेने आम्हाला दुसऱ्यांदा सत्तेत बसवले.'

Himachal Assembly Elections 2022:  आगामी गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकांसाठी सर्वच पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. हिमाचलमध्ये भाजपचे अनेक बडे नेते मोठ-मोठ्या सभा घेत आहेत. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी कांगडा येथील चंबी मैदानावरून हिमाचलच्या जनतेला संबोधित कले. यावेळी त्यांनी भाजपच्या 'डबल इंजिन सरकार'चे कौतुक करण्यासोबतच काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. 

'काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार''काँग्रेस हिमाचलला स्थिर सरकार कधीच देऊ शकत नाही आणि देऊ इच्छित नाही. त्यांची फक्त दोन-तीन राज्यात सत्ता उरलीये. काँग्रेसच्या राज्यातून कधी विकासाच्या बातम्या येतात का? फक्त भांडणाच्या बातम्या येतात. काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार, काँग्रेस म्हणजे विकासातील अडथळा. घराणेशाही, हाच काँग्रेसचा आधार आहे. असे सरकार कधीच विकास करू शकणार नाही,' अशी घणाघाती टीका पीएम मोदींनी केली.'काँग्रेस म्हणजे अस्थिरता'

ते पुढे म्हणाले की, 'उत्तराखंडच्या जनतेने जुनी परंपरा बदलून भाजपला विजय मिळवून दिला. उत्तर प्रदेशातही 40 वर्षांनंतर एखादा पक्ष सलग दुसऱ्यांदा सत्तेत आला. मणिपूरमध्येही पुन्हा भाजपचे सरकार आले आहे. अशी राजकीय परंपरा निर्माण करायची आहे की, मतदार आम्हाला पुन्हा पुन्हा संधी देतील. म्हणूनच आम्ही विकासासाठी आणि देशासाठी काम करत आहोत. काँग्रेस म्हणजे अस्थिरतेची हमी, काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार, घोटाळ्याची हमी आणि काँग्रेस म्हणजे विकासकामांमध्ये अडथळे आणण्याची हमी', असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

भाजपच्या कामांचा वाचला पाढा'केंद्र सरकारने उज्ज्वला योजना सुरू केली, हिमाचलच्या भाजप सरकारने गृहिणी योजना चालवून त्यात आणखी लोकांना जोडले. केंद्र सरकारने आयुष्मान योजना सुरू केली, हिमाचलच्या भाजप सरकारने हिमकेअर योजनेतून अधिक लोकांना जोडले. दुहेरी इंजिन सरकार असेच काम करत आहे. काँग्रेस सरकारने पेन्शनचे वय 80 वर्षे केले आणि कमाईची अटही ठेवली. भाजप सरकारने पेन्शनचे वय 60 वर्षे केले आणि कमाईची अटही हटवली. याचा फायदा लाखो ज्येष्ठ नागरिकांना झाला. प्रत्येकाला सामाजिक सुरक्षा मिळावी यासाठी केंद्र सरकारने पेन्शन आणि विमा योजना सुरू केल्या. शेतकरी, मजूर आणि छोट्या दुकानदारांना नियमित 3 हजार रुपये पेन्शन मिळावी यासाठी आम्ही मार्ग काढला,' असा योजनांचा पाढाही मोदींनी वाचला.  

टॅग्स :BJPभाजपाHimachal Pradeshहिमाचल प्रदेशElectionनिवडणूकcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी