हिमाचल प्रदेश - बस दरीत कोसळून 28 प्रवाशांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 12:23 IST2017-07-20T11:14:52+5:302017-07-20T12:23:01+5:30

शिमला जवळील रामपूर येथे ही बस दरीत कोसळली

Himachal Pradesh: 28 passengers died in a collapse in the valley | हिमाचल प्रदेश - बस दरीत कोसळून 28 प्रवाशांचा मृत्यू

हिमाचल प्रदेश - बस दरीत कोसळून 28 प्रवाशांचा मृत्यू

ऑनलाइन लोकमत
शिमला, दि. 20 - हिमाचल प्रदेशात एका खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. बस दरीत कोसळून झालेल्या या भीषण अपघातात 28 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर नऊ प्रवासी जखमी झाले आहेत. शिमला जवळील रामपूर येथे ही बस दरीत कोसळली. गुरुवारी सकाळी 9.15 वाजता ही दुर्घटना घडली. 
 
बसमधून जवळपास 40 प्रवासी प्रवास करत होते. ही बस किन्नौर येथून सोलानला जात असताना रस्स्त्यातच ही दुर्घटना घडली. शिमलापासून 120 किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्ग 5 वर रामपूर येथे बसचा अपघात झाला. 
 
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्याला सुरुवात केली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Himachal Pradesh: 28 passengers died in a collapse in the valley