हिमाचल प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; 7 महिलांचा होरपळून मृत्यू, 10 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 14:25 IST2022-02-22T14:24:39+5:302022-02-22T14:25:44+5:30

Himachal Factory Blast : जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Himachal Factory blast himachal pradesh una tahliwal firecracker factory blast many died | हिमाचल प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; 7 महिलांचा होरपळून मृत्यू, 10 जखमी

हिमाचल प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; 7 महिलांचा होरपळून मृत्यू, 10 जखमी

नवी दिल्ली - हिमाचल प्रदेशमधील ऊना जिल्ह्यामध्ये एका फटाक्याच्या कारखान्यामध्ये मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये सात महिलांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 10 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहे. प्रशासकिय अधिकारी आणि स्थानिकांच्या मदतीने वेगाने बचावकार्य सुरू आहे. मृतांमध्ये एका तीन वर्षीय चिमुकलीचा देखील समावेश आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार ऊना येथील हरोलीमधील टाहलीवाल येथील फटाक्यांच्या कारखान्यामध्ये हा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे कारखान्याला आग लागली आणि त्यामध्ये सात महिला कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्यांना ऊना येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर सात महिलांचे मृतदेह मदतकार्य करणाऱ्या टीमच्या हाती लागले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

मृतांमध्ये एका तीन वर्षाच्या मुलीचाही समावेश असून कामगार असणाऱ्या आपल्या आईसोबत ही मुलगी कारखान्यात आलेली असं सांगण्यात येत आहे. सर्व महिला उत्तर प्रदेशच्या असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे मात्र प्रशासनाने अद्याप मृत महिलांबद्दल कोणतीही अधिकृत माहिती जारी केलेली नाही. जखमींपैकी एका महिलेने दिलेल्या माहितीनुसार, स्फोट झाला तेव्हा कारखान्यामध्ये अनेक कर्मचारी काम करत होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: Himachal Factory blast himachal pradesh una tahliwal firecracker factory blast many died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.