शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
2
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
3
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
4
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
5
आयकर विभागाचा मोठा छापा; हवाला व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांकडून २५ कोटींची रोकड, हिरे, सोनं जप्त
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
7
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
8
व्हॉट्सॲपवरून ट्रिपल तलाक; पतीवर गुन्हा, पत्नीला धमकावल्याचा आरोप 
9
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
10
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
11
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
12
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
13
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
14
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
15
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
16
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
17
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
18
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
19
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
20
नेपाळ, नेदरलँड्स देऊ शकतात धक्का : गिलख्रिस्ट 

इंधन दरवाढीचा भडका, मुंबईत पेट्रोल 21 तर डिझेल 30 पैशांनी महागले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 8:15 AM

पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस अधिकच वाढ होत आहे.

नवी दिल्ली - पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस अधिकच वाढ होत आहे. मुंबईत शुक्रवारी (31 ऑगस्ट) पेट्रोल 21 पैसे प्रति लिटर आणि डिझेल 30 पैसे प्रति लिटर महाग झाले आहे. यामुळे मुंबईत आजचा पेट्रोलचा प्रतिलिटर दर 85.93 दर तर डिझेलचा प्रतिलिटर दर 74.54 झाला आहे. 

राजधानी दिल्लीत पेट्रोल 22 पैसे तर डिझेल 28 पैशांनी प्रतिलिटरमागे महाग झाले आहे. यामुळे दिल्लीमध्ये पेट्रोलसाठी एक लिटरमागे 78.52 रुपये तर डिझेलसाठी प्रतिलिटर 70.21 रुपये नागरिकांना मोजावे लागत आहे.

पेट्रोलच्या दरवाढीने जनतेचे हाल, सरकार मात्र मालामाल

तेलाच्या किंमतीबाबत यूपीए सरकारवर भाजपा सतत टीका करीत असे. पण मोदी यांचे सरकार आज काहीही कारणे सांगो, पण तेलाच्या या खेळात सरकार मालामाल होत आहे. लोकांना 2012 च्या तुलनेत आज फार मोठी किंमत चुकवावी लागत आहे. सरकारच्या तिजोरीत कराद्वारे येणारा महसूल वाढत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात 2012 मध्ये तेलाच्या किंमती प्रति बॅरल 109.45 डॉलर असताना दिल्लीत एक लिटर पेट्रोलसाठी 68.48 व मुंबईत 74.23 रुपये मोजावे लागत होते. आज कच्च्या तेलाच्या किंमती 70 डॉलर प्रति बॅरल आहेत. पण, दिल्ली, मुंबईत पेट्रोलसाठी लोकांना अनुक्रमे 78 व 85 रुपये द्यावे लागत आहेत.

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलMumbaiमुंबईdelhiदिल्ली