Hijab High Court Hearing: जेव्हा मी विद्यार्थी होतो, तेव्हा शाळेचा रंग एकच होता; हिजाब वादावर न्यायमूर्तींना झाली आठवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 17:44 IST2022-02-09T17:43:49+5:302022-02-09T17:44:14+5:30
Karnataka Hijab Controversy: कॉलेजमध्ये प्रवेश न दिल्याने उडुपीच्या सहा विद्यार्थींनींनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यानंतर मोठा वाद उफाळला आहे.

Hijab High Court Hearing: जेव्हा मी विद्यार्थी होतो, तेव्हा शाळेचा रंग एकच होता; हिजाब वादावर न्यायमूर्तींना झाली आठवण
बंगळुरु : कर्नाटकमधील शाळा, कॉलेजांमध्ये हिजाबवरून सुरु झालेल्या वादावर देशभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. हा वाद आता उच्च न्यायालयाच्या मोठ्या बेंचसमोर मांडला जाणार आहे. दरम्यान, कर्नाटकउच्च न्यायालयाच्या सिंगल बेंचसमोर दोन दिवस सुनावणी झाली. यावेळी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्णा दीक्षित यांनी त्यांच्या शाळेचे दिवस कसे होते हे न्यायालयात सांगितले.
कॉलेजमध्ये प्रवेश न दिल्याने उडुपीच्या सहा विद्यार्थींनींनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर गेल्या दोन दिवसांपासून सुनावणी सुरु होती. आज दीक्षित यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी ते म्हणाले की, जेव्ही मी विद्यार्थी होतो तेव्हा शाळांचा रंग एकच असायचा. मला वाटते की हे प्रकरण मोठ्या पीठासमोर पाठविण्याची गरज आहे. या प्रकरणी दुसऱ्या राज्यांतील उच्च न्यायालयांनी दिलेले निर्णयही पाहण्याची गरज आहे.
याचिकाकर्त्यांनी या प्रकरणी लवकरात लवकर निकाल देण्याची मागणी केली आहे. यामुळे हे प्रकरण दोन सदस्यांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आले आहे. अधिवक्ता आदित्य सिंह यांनी म्हटले की, शाळेचा गणवेश हा सार्वजनिक व्यवस्थेचा महत्वाचा भाग आहे. कारण सार्वजनिक व्यवस्थेचा अर्थ शाळांमध्ये शिस्त असा आहे.