शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणात हायव्होल्टेज ड्रामा! मोदींच्या सभेपूर्वी भाजपा प्रदेशाध्यक्षांना अटक, दोन आमदार ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 13:09 IST

बंदी संजय यांना का ताब्यात घेण्यात आले आहे, याची माहिती पोलीस देत नसल्याचे भाजपा नेत्यांचे म्हणणे आहे. संजय यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे.

तेलंगणाचेभाजपा प्रदेशाध्यक्ष आणि खासदार बंदी संजय यांना पोलिसांनी मध्यरात्री अचानक ताब्यात घेतले आहे. यामुळे तिथे राजकीय वातावरण तणावाचे बनले असून पोलीस बंदी संजय यांना दुसऱ्या पोलीस ठाण्यात पाठविण्याची तयारी करत आहेत. पोलीस ठाण्यासमोर भाजपाचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. बंदी संजय यांना अटक करण्यात आली असून भाजपाच्या दोन आमदारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

तेलंगणापोलिसांनी बुधवारी भाजप आमदार रघुनंदन राव आणि एटाळा राजेंद्र आणि इतर नेत्यांना ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यासमोर भाजप कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. पोलिस आणि भाजप नेत्यांमध्ये बाचाबाची झाल्याने कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांना मध्यरात्रीच पोलिसांनी अटक केल्याचे समजताच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पक्षाचे हैदराबादमधील प्रमुख नेते रामचंदर राव यांच्याशी चर्चा करत कारण विचारले आहे. याचबरोबर केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी देखील तेलंगणाचे डीजीपी अंजनी कुमार यांना फोन करून चर्चा केली आहे. यानंतर संसद परिसरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि नड्डा यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे. 

तेलंगणा भाजपचे अध्यक्ष आणि खासदार बंदी संजय यांना यादद्री भुवनगिरी जिल्ह्यातील बोम्माला रामाराम पोलिस स्टेशनमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस बंगारू श्रुती यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार बंदी संजय यांच्या ताब्यात घेण्याबाबत उच्च न्यायालयात कैद्याला न्यायालयासमोर प्रत्यक्ष हजर करण्याची लेखी ादेश देणारी याचिका दाखल केली आहे. 

बंदी संजय यांना का ताब्यात घेण्यात आले आहे, याची माहिती पोलीस देत नसल्याचे भाजपा नेत्यांचे म्हणणे आहे. संजय यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे. मोदींचा या राज्यात दौरा आहे, त्यापूर्वीच संजय यांना ताब्यात घेण्यात आल्याने भाजपा कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. याविरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असून लोकशाहीचा गळा घोटला जात असल्याचा आरोप भाजपा नेत्यांनी केला आहे. 

प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी आम्ही केसीआर सरकारविरोधात आवाज उठवत आहोत, हे या कारवाईमागचे कारण आहे. हे सर्व 'लोकशाही' विरोधात आहे,' असा आरोप रेड्डी यांनी केला आहे. 

टॅग्स :TelanganaतेलंगणाBJPभाजपाPoliceपोलिस