Jaipur Accident: राजस्थानच्या जयपूरमधून हादरवारी घडना समोर आली आहे. जयपूरमध्ये एका भरधाव एसयूव्ही कारने रस्त्यावर गोंधळ उडवला. दारूच्या नशेत कारखाना मालकाने शहरातील गर्दीच्या रस्त्यावर ७ किमीपर्यंत एसयूव्ही भरधाव वेगात चालवली. कार चालकाने नऊ जणांचा चिरडलं. या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून सहा पादचारी गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जयपूरमध्ये अनियंत्रित कारने कारमध्ये नऊ जणांना चिरडले. या अपघातात एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला. तर सहा जण गंभीर जखमी आहेत. सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडली. जयपूरमधील एमआय रोडवर एका भरधाव कारने वाहनांना धडक दिल्याची माहिती मिळाली होती. यानंतर भरधाव गाडी शहरातील अरुंद रस्त्यांमध्ये शिरली. लोकांना चिरडल्यानंतर, कार एका अरुंद रस्त्यावर अडकली आणि स्थानिक लोकांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला पकडले. या घटनेनंतर मंगळवारी सकाळपासून लोक नाहरगड पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन करत आहेत.
वीरेंद्र सिंग (४८), ममता कंवर (५०), मोनेश सोनी (२८), मोहम्मद जलालुद्दीन (४४), दीपिका सैनी (१७), विजय नारायण (६५) गोविंद (२४) आणि अवधेश पारीक (३७) यांना उपचारासाठी जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी ममता कंवर आणि अवधेश यांना मृत घोषित केले. मंगळवारी सकाळी वीरेंद्र सिंगचा मृत्यू झाला. नाहरगड रोडवर कारने धडक दिलेल्या ७ जखमींची प्रकृती गंभीर आहे. त्यांना सवाई मानसिंग रुग्णालयाच्या ट्रॉमा वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.
अतिरिक्त डीसीपी (उत्तर) बजरंग सिंह शेखावत म्हणाले की, आरोपी चालक उस्मान खान (६२) याने सुमारे ५०० मीटरच्या परिसरात लोकांना चिरडले. नाहरगड पोलीस स्टेशन परिसरातील संतोष माता मंदिराजवळ,आरोपी चालकाने आधी स्कूटर, बाईकला धडक दिली आणि नंतर रस्त्यावर पडलेल्या लोकांना चिरडून पळ काढला. आरोपी पोलिस ठाण्याबाहेर उभ्या असलेल्या वाहनांनाही धडक दिली. आरोपीने सुमारे एक तास भरधाव वेगाने गाडी चालवली.
पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने आरोपी उस्मान खान याला पकडलं. रात्री उशिरा आरोपी उस्मान खानचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, तो मद्यधुंद होता. आरोपी हा जयपूरमधील शास्त्री नगर येथील राणा कॉलनीचा रहिवासी आहे. त्यांचा विश्वकर्मा औद्योगिक वसाहतीमध्ये त्याचा लोखंडी पलंग बनवण्याचा कारखाना आहे. मृतांच्या कुटुंबियांनी आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. सोमवारी संध्याकाळी झालेल्या या अपघातानंतर स्थानिक लोकांमध्ये प्रचंड संताप असून लोक रस्त्यावर उतवरले आहेत.
बहुतेक लोक नाहरगड पोलीस स्टेशन परिसरात जखमी झाले आहेत. स्थानिक दिलेल्या माहितीनुसार उस्मानने नाहरगड पोलीस स्टेशनजवळ एका स्कूटरला धडक दिली. त्यावर बसलेले तीन जण जखमी झाले. त्यानंतर, त्याने २०० मीटर पुढे एका स्कूटर आणि एका बाईकला धडक दिली. त्यानंतर संतोषी माता मंदिराजवळ त्याने लोकांना चिरडले. अपघातानंतर लोक त्याची गाडी थांबण्यासाठी त्याचे मागे धावले. लोकांची गर्दी पाहून चालक उस्मानने पुन्हा गाडी पळवली. पोलिसांनी त्याला कारसह एक किलोमीटर अंतरावर असलेल्या संजय सर्कल येथे पकडले.